आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Vaccine Tracker India State Wise Latest News Update | COVID Vaccine News; Know How Many People Vaccinated Latest Data

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशात कोरोना लसीकरण:भारतात पहिल्यांदाच एका दिवसात देण्यात आले कोरोना लसीचे 15 लाख डोज

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अजुनही अमेरिकेपेक्षा खूप मागे आहे भारत

भारतात गेल्या 5 दिवसांमध्ये लसीकरण करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सर्व जुने विक्रम मोडत 5 मार्चला 14.94 लाख डोज देण्यात आले आहेत. यापूर्वी 1 मार्चला 5.52 लाख डोज देण्यात आले होते. जे 4 मार्चला वाढवून 13.88 लाख डोज झाले होते.

आरोग्य मंत्रालयानुसार शनिवारी सकाळी 7 वाजेपर्यंतच्या डेटानुसार, भारतात आतापर्यंत 1.94 कोटी डोज देण्यात आले आहेत. यामध्ये 1.59 कोटी लोकांनी पहिला आणि 35.01 लाख लोकांनी दुसरा डोज घेतला आहे.

देशात 16 जानेवारीला आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यासोबतच कोरोना लसीकरणाची सुरुवात झाली होती. 2 फेब्रुवारीपासून फ्रंटलाइन वर्कर्सलाही लस देण्यात आली होती. 13 फेब्रुवारीपासून हेल्थकेअर वर्कर्सला दुसरा डोज देण्यात येत आहे. फ्रंटलाइन वर्कर्सला दुसरा डोज देण्याची सुरुवात 2 मार्चला झाली आणि बुधवारी जवळपास 3,500 फ्रंटलाइन वर्कर्सला दुसरा डोज देण्यात आला. 1 मार्चपासून सरकारने सीनियर सिटीजन आणि 45-59 वर्षांच्या गंभीर आजाराचा सामना करत असलेल्या लोकांना लसीकरणात सामिल करण्यात आले. यासोबतच खासगी रुग्णालयांनाही लस देण्यासाठी अधिकृत केले. यानंतरपासून आकड्यांमध्ये वाढ होत आहे.

अजुनही अमेरिकेपेक्षा खूप मागे आहे भारत
संपूर्ण जगभरात अमेरिकेतच लसीकरणाचा वेग सर्वात जास्त आहे. येथे आतापर्यंत 8.2 कोटींपेक्षा जास्त लोकांना लस देण्यात आली आहे. यानंतर चीन (5.2 कोटी),यूके (2.2 कोटी) चा नंबर येतो. भारत 1.94 कोटींसह चौथ्या क्रमांकावर आहे. गेल्या काही दिवसांमध्ये लसीकरणाचा जो वेग वाढत आहे, ते पाहून वाटते की, पुढच्या आठवड्यात लसीचे डोज येण्याच्या बाबतीत भारत यूकेला पछाडून तिसऱ्या क्रमांकावर जाईल.

बातम्या आणखी आहेत...