आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Vaccine Tracker Russia Sputnik VCOVID 19 Vaccine Approval Latest Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

व्हॅक्सीन ट्रॅकर:रशियाची कोरोना व्हॅक्सीन स्पुतनिक V असू शकते भारताची तिसरी व्हॅक्सीन; मार्चमध्ये मिळू शकते परवानगी, किंमत असेल 730 रुपये

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारतात सर्वात इफेक्टिव्ह आणि स्वस्त व्हॅक्सीन असेल

सध्या भारतात कोरोनाविरोधात सुरु असलेल्या व्हॅक्सीनेशन अभियानात दोन व्हॅक्सीन कोवीशील्ड आणि कोव्हॅक्सीनचा वापर केला जात आहे. लवकरच यामध्ये तिसऱ्या व्हॅक्सीनचा समावेशहोऊ शकते. ही रशियाची व्हॅक्सीन स्पुतनिक V असू शकते. भारतामध्ये हैद्राबादची कंपनी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरी याचे ट्रायल्स करत आहेत आणि आशा आहे की, मार्चमध्ये ही व्हॅक्सीनही आपत्कालीन मंजुरीसाठी औषध नियामकांकडे जाऊ शकते. ही लस भारतात 10 डॉलर (सुमारे 730 रुपये) मध्ये उपलब्ध होईल.

सध्या जगभरात ज्या 10 व्हॅक्सीन मंजुर झाल्या आहेत. त्यामध्ये स्पुतनिक V सह अमेरिकन कंपन्या फायजर आणि मॉर्डनाची व्हॅक्सीन 90% पेक्षा जास्त इफेक्टिव्ह सिद्ध झाली आहे. या कारणास्तव, कोरोनाविरूद्धच्या लढाईला भारतामध्ये रशियन लस उपलब्ध झाल्यामुळे आणखी बळकटी मिळण्याची अपेक्षा आहे. रशियन लस रशियाच्या गमालेया इन्स्टिट्यूटने तयार केली आहे आणि रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (RDIF) ने वित्तपुरवठा केला आहे. RDIF जगभरात या व्हॅक्सीनिवषयी सौदा करत आहे.

RDIF सीईओ किरिल दिमित्रेव यांनी म्हटले की, सध्या 90% पेक्षा जास्त इफेक्टिव्हनेस सिद्ध करणारी मॉर्डना आणि फायजरीच्या व्हॅक्सीनची किंमत स्पुतनिक V च्या किंमतीपेक्षा तीन पटींनी जास्त आहे. यामुळे रशियन व्हॅक्सीनला संपूर्ण जगात जास्तीत जास्त देशांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ही 2 ते 8 डिग्री सेल्सियस तापमानात स्टोर केली जाऊ शकते. सध्याच्या सप्लाय चेनमध्ये हे सहज उपलब्ध आहे. रशियन व्हॅक्सीन दोन एडेनोव्हायरस वेक्टरने बनली आहे. कंपनी सध्या ब्रिटिश फर्म एस्ट्राजेनेकासोबत त्यांची व्हॅक्सीन - कोवीशील्डसोबत कंबाइंड ट्रायल्सविषयी बोलत आहे. कंपनीचा दावा आहे की, एस्ट्राजेनेकाच्या व्हॅक्सीनचा इफेक्टिव्हनेस यामुळे अजून वाढेल.

भारतात सर्वात इफेक्टिव्ह आणि स्वस्त व्हॅक्सीन असेल
जर रशियन लस सर्व चाचण्यांमध्ये यशस्वी झाली आणि भारतात मंजूर झाली तर, चाचण्यांमध्ये ही सर्वात प्रभावी लस असेल. भारतात वापरल्या जाणार्‍या कोविशील्ड लसची कार्यक्षमता 70% आहे, तर कोव्हॅक्सीनच्या फेज -3 चाचण्या अद्याप पूर्ण झाल्या नाहीत. यामुळे, त्याच्या इफेक्टिव्हनेसविषयी परिस्थिती स्पष्ट नाही.

सरकारला कोवशील्डचा एक डोस 200 रुपये तर कोवाक्सिनचा एक डोस 295 रुपयांना मिळत आहे. तर बाजारात कोविशील्डचा डोज एक हजार रुपयांचा असेल. कोवाक्सिनने अद्याप बाजारभाव जाहीर केला नाही. अशा परिस्थितीत, 730 रुपये किंमतीची स्पुतनिक V बाजारातील स्वस्त आणि प्रभावी लस असू शकते.

आतापर्यंत कोणत्या देशांना मान्यता मिळाली आहे
दिमित्रेव म्हणाले की स्पुतनिक V ला आतापर्यंत रशिया, बेलारूस, सर्बिया, अर्जेंटिना, बोलिविया, अल्जेरिया, पॅलेस्टाईन, वेनेजुएला, पैराग्वे, युएई, तुर्कमेनिस्तान मध्ये मान्यता मिळाली आहे. त्याला मान्यता देणारा युरोपियन युनियनमधील हंगेरी पहिला देश ठरला आहे. युरोपियन युनियनच्या ड्रग रेग्युलेटरकडून लवकरच मान्यता मिळू शकते.

बातम्या आणखी आहेत...