आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Variant BF7 Cases Update; Covid Situation India | Delhi Maharashtra Mumbai | Corona Latest News

देशात कोरोनाचा धोका:सरकार म्हणाले- आता दुसऱ्या बूस्टर डोसची गरज नाही; गेल्या 24 तासांत कोरोनाचे 173 नवीन रुग्ण

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

देशात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. दरम्यान, सरकारी सूत्रांचा हवाला देत वृत्तसंस्था एएनआयने सांगितले आहे की बूस्टर डोसचा दुसरा डोस देशात दिला जाणार नाही. जोपर्यंत सर्व नागरिकांना प्रिकॉशन डोस दिला जात नाही तोपर्यंत सरकार यावर कोणताही निर्णय घेणार नाही.

गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 173 नवीन रुग्ण आढळले असून 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या कोरोनाचे 1698 सक्रिय रुग्ण आहेत. दुसरीकडे केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ.मनसुख मांडविया सोमवारी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. येथे त्यांनी कोविड-19 चाचणी आणि तपासणीच्या सुविधेचा आढावा घेतला.

पुढे जाण्यापूर्वी, कोरोनाशी संबंधित आत्तापर्यंतचे अपडेट्स वाचा…

  • पंतप्रधानांच्या प्रधान सचिवांनी कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला
  • XBB.1.5 प्रकाराचे पहिले प्रकरण शनिवारी गुजरातमध्ये आढळून आले, ते ओमायक्रॉनचे म्युटेशन आहे.
  • देशात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तेलंगणामध्ये 900 डॉक्टर आणि 5000 स्टाफ नर्सची भरती करण्यात येणार आहे.

लस देखील XBB.1.5 व्हेरिएंटला रोखू शकणार नाही:104 पट वेगाने पसरते संक्रमण; जाणून घ्या- तज्ज्ञांकडून 8 प्रश्नांची उत्तरे

कोरोनाचा XBB.1.5 चा नवा सबव्हेरिएंट अमेरिकेत आढळून आला आहे. तर या व्हायरस व्हेरिएंटने सद्या या ठिकाणी अनेक लोक बाधित झालेले आहेत. हा व्हेरिएंट आत्तापर्यंतचा सर्वात वेगाने पसरणारा संक्रमण करणारा असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे, त्याचा वेग यापूर्वीच्या कोरोना व्हेरिएंटपेक्षा 104 पटीने जास्त आहे. संपूर्ण बातमी येथे वाचा...

बातम्या आणखी आहेत...