आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Coronil Medicine Developed By Yoga Guru Ramdev Baba, Claims 100% Cure In 7 Days In Clinical Trial

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनाचे पहिले आयुर्वेदिक औषध:योगगुरू रामदेव बाबांनी तयार केले कोरोनिल औषध, क्लीनिकल ट्रायलमध्ये 7 दिवसात 100% रुग्ण बरे झाल्याचा दावा 

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पतंजलीने कोरोना किटमध्ये कोरोनिल, श्वसारि आणि अणु तेल लॉन्च केले
  • 3 दिवसात 69% रुग्ण झाले बरे, डेथ रेट 0% असल्याचा दावा

नवी दिल्ली | योग गुरू रामदेव बाबांनी आयुर्वेदिक औषधाने कोरोनावर उपचार करण्याचा दावा केला आहे. यासाठी कोरोनिल नावाने औषध लॉन्च करण्यात आलेआहे. याला पतंजली योगपीठने तयार केले आहे. 

या औषधाच्या क्लिनिकल केस स्टडीमध्ये 280 रुग्णांचा समावेश करण्यात आला होता. 100 लोकांवर क्लीनिकल कंट्रोल ट्रायल करण्यात आली. 3 दिवसांच्या आत 69% रुग्ण हे पॉझिटिव्हचे निगेटिव्ह झाले. 7 दिवसांच्या आत 100% रुग्ण बरे झाल्याचा दावा योगगुरू रामदेव बाबा यांनी केला आहे. 

देशात कोरोना संक्रमणाचा आकडा वाढून 4 लाख 40 हजार 450 झाला आहे. गेल्या 24 तासांत 13 हजार 548 नवीन प्रकरणे समोर आली. 10 हजार 879 रूग्ण बरे झाले आहेत आणि 312 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक 3721 नवीन घटना समोर आल्या असून येथे सर्वाधिक 113 मृत्यू झाले आहेत. दिल्लीत 2909 रुग्ण वाढले. तर सर्वाधिक 3589 रुग्ण बरे झाले. 

बातम्या आणखी आहेत...