आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Coronil Medicine | Swami Ramdev Patanjali Coronavirus Coronil Medicine Latest News And Updates; Dr. Harsh Vardhan And Nitin Gadkari

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनाचे स्वदेशी औषध बनवल्याचा दावा:2 केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थित्ती रामदेब बाबांनी लॉन्च केले कोरोनाचे औषध

नवी दिल्ली6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • यावेळी बाबा रामदेव यांनी रिसर्च पेपरदेखील दाखवले

योग गुरु बाबा रामदेव यांनी शुक्रवारी कोरोनाचे औषध लॉन्च केले. त्यांचा दावा आहे की, हे औषध WHO सर्टिफाइड आहे. याचे क्लिनिकल ट्रायलदेखील झाले आहेत. या औषध लॉन्चिंगच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन आणि नितिन गडकरी उपस्थित होते. यावेळी त्यांनी कोरोनाच्या फर्स्ट एविडेंस बेस्ड मेडिसिनवर सायंटिफिक रिसर्च पेपर सादर केले.

यावेळी बाबात रामदेव म्हणाले की, आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. आमची इच्छा आहे की, योग आयुर्वेदच्या रिसर्च बेस्ड मेडिसिनद्वारे आपला देश मेडिकल क्षेत्रात संपूर्ण जगाला लीड करावा. यामुळेच या औषधाला लॉन्च करण्यासाठी हा दिवस निवडला. याबाबत अनेक रिसर्च पेपर सादर झाले आहेत. कोरोनील लॉन्च केल्यावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. आयुर्वेदात रिसर्च केल्यावर अनेकजण प्रश्न उपस्थित करतात.

जूनमध्ये कोरोनील लॉन्च केली होती

योग गुरु रामदेव यांच्या पतंजली कंपनीने 23 जूनला कोरोनील औषधाला लॉन्च केले होते. या औषधाला कोरोना रुग्णावर ट्रायल केल्यानंतर लॉन्च केल्याचा दावा त्यांनी केला होता. यावर वादंग उठल्यानंतर आयुष मंत्रालयाने 5 तासानंतर या औषधाच्या प्रचारावर बंदी घातली होती. 7 दिवसानंतर बाबा रामदेव माध्यमासमोर आले होते आणि त्यांच्या औषधावरील बंदी उठल्याचे जाहीर केले होते.