आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • Corpses And Blood On The Road, Chief Calling Everywhere, 56 People Died In An Hour

अहमदाबाद स्फोटातील विध्वंस:रस्त्यावर मृतदेह, सर्वत्र किंचाळ्या; तासाभरात 56 जणांनी गमावला होता जीव, पाहा अंगावर शहारा आणणारे 8 फोटोज

नवी दिल्ली6 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक

गुजरातच्या अहमदाबादमध्ये 26 जुलै, 2008 ला झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात शुक्रवारी सर्व दोषींना शिक्षा सुनावण्यात आली आहे. 38 दोषींना फाशी आणि 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. एखाद्या प्रकरणात एवढ्या सर्व दोषींना एकाच वेळी फाशीची शिक्षा सुनावण्याची ही पहिलीच वेळ आहे. जवळपास 13 वर्षांपेक्षा अधिक काळ चाललेल्या सुनावणीनंतर गेल्या आठवड्यात 8 फेब्रुवारीला कोर्टाने 49 लोकांना दोषी ठरवले होते आणि 28 लोकांची निर्दोष मुक्तता केली होती.

13 वर्षांपूर्वी अहमदाबादमध्ये 70 मिनिटांत 21 बॉम्बस्फोट झाले होते. शहरातील या साखळी बॉम्बस्फोटांमध्ये 56 जणांचा मृत्यू झाला होता, तर 200 लोक जखमी झाले होते. या स्फोटांनंतर, रस्त्यावर मृतदेह आणि रक्त दिसत होते, उंच इमारती कोसळल्या होत्या आणि वाहनांचा चुराडा झाला होता.

या ठिकाणांवर झाले होते 21 स्फोट

 • अहमदाबाद सिविल अस्पताल, ट्रॉमा सेंटर
 • खादिया
 • रायपुर
 • सारंगपुर
 • ए जी अस्पताल
 • मणीनगर
 • धमाके हाटकेश्वर
 • बापूनगर
 • ठक्कर बापा नगर
 • जवाहर
 • गोविंदवाडी
 • इसनपुर
 • नारोल
 • सरखेज

8 फोटोंमध्ये पाहा अहमदाबाद स्फोटांनंतरची वेदनादायी दृष्य

या स्फोटांने इमारतींना आग लागली. येथे अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी फायर ब्रिगेडच्या अनेक गाड्यांना तैनात करण्यात आले.
या स्फोटांने इमारतींना आग लागली. येथे अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी फायर ब्रिगेडच्या अनेक गाड्यांना तैनात करण्यात आले.
या स्फोटांमध्ये गाड्यांची अशी अवस्था झाली तर मानवांचे काय झाले असेल.
या स्फोटांमध्ये गाड्यांची अशी अवस्था झाली तर मानवांचे काय झाले असेल.
स्फोटानंतर स्टूटरवर कुणाचातरी बुट होता तर कुणाचा गमछा सायकलवर अडकलेला होता.
स्फोटानंतर स्टूटरवर कुणाचातरी बुट होता तर कुणाचा गमछा सायकलवर अडकलेला होता.
या स्फोटांनंतर संपूर्ण शहरात भीतीदायक वातावरण होते.
या स्फोटांनंतर संपूर्ण शहरात भीतीदायक वातावरण होते.
स्फोटात जखमी झालेल्या लोकांना रुग्णालयात पोहोचण्यासाठीही वेळ मिळाला नाही आणि त्यांनी जागेवरच प्राण सोडले.
स्फोटात जखमी झालेल्या लोकांना रुग्णालयात पोहोचण्यासाठीही वेळ मिळाला नाही आणि त्यांनी जागेवरच प्राण सोडले.
स्फोटामध्ये अनेक इमारती कोसळल्या, मोठ्या संख्येत वाहनांचा चुराडा झाला.
स्फोटामध्ये अनेक इमारती कोसळल्या, मोठ्या संख्येत वाहनांचा चुराडा झाला.
कुणी घरातून भाजी आणायला निघाले होते तर कुणी फळ आणायला. पण त्यांना काय माहिती होते की, कुटुंबियांना रस्त्यावर त्यांचे चिथडे मिळतील.
कुणी घरातून भाजी आणायला निघाले होते तर कुणी फळ आणायला. पण त्यांना काय माहिती होते की, कुटुंबियांना रस्त्यावर त्यांचे चिथडे मिळतील.
गाड्यांचे तुकडे दिसत होते मात्र त्यात बसलेल्यांची मृतदेह देखील मिळत नव्हती.
गाड्यांचे तुकडे दिसत होते मात्र त्यात बसलेल्यांची मृतदेह देखील मिळत नव्हती.
बातम्या आणखी आहेत...