आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभोपाळच्या शासकीय होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. एस. सी. अवस्थी यांची मुलगी जागृतीने त्यांना सांगितले की, 'पप्पा, मला यूपीएससी पास करायचे आहे'. हे ऐकून वडील डॉ. अवस्थी क्षणभर खोल विचारात पडले. कारण तेव्हा आपली मुलगी भेल (BHEL) मध्ये इंजिनीअर होती. पगार आणि पदही खूप मोठे होते. परंतु, जागृतीने वडिलांना व्यवस्थित समजून सांगितल्यावर ते यावर सहमत झाले.
जागृतीने सकाळ होताच आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि यूपीएससी करत आयएएस होण्याची तयारी सुरु केली. जागृतीला भलेही पहिल्या प्रयत्नात यश मिळवता आले नाही. परंतु, तीने सातत्य सोडले नाही, हार मानली नाही. पहिल्या प्रयत्नातून आपल्याला आणखी मेहनत घ्यावी लागणार हे समजले आणि पुन्हा तयारीला लागली.
जागृती अशा प्रकारे अभ्यासात मग्न होती की, तिला यूपीएससी वगळता काहीच दिसत नव्हते. जागृतीने यूपीएससीची तयारी करण्यापूर्वी सर्वप्रथम यूपीएससीची मानक पुस्तके शोधली आणि नंतर अभ्यास सुरू केला. ती दररोज 8 ते 9 तास अभ्यास करायची. परंतु, परीक्षा जवळ आल्यावर तिने 12 ते 14 पर्यंत अभ्यास सुरू केला आणि शेवटी यश मिळवले.
जागृतीच्या शब्दांतून यशाची कथा
यूपीएससी मधील ओव्हरऑल दुसरा क्रमांक... अनपेक्षित आहे. परिश्रम आणि पालकांमुळे हे शक्य झाले आहे. मी 2017 ते 2019 पर्यंत भेलमध्ये काम केले आहे. भेलमध्ये काम करत असताना परीक्षा क्लिअर करायला सुरुवात केली. वर्ष 2019 मध्ये पहिला प्रयत्न केला, पण पूर्वपरीक्षा देखील काढू शकले नाही. यानंतर, जुलै 2019 पासून पुन्हा अभ्यास सुरू केला. कोरोनामुळे अनेक आव्हाने होती, परंतु, अभ्यास असेच सुरुच ठेवले. सुरुवातीला कोचिंगची मदत घेतली. पण नंतर घरीच बसून अभ्यास केला.
गाव विकास आणि मुलांच्या शिक्षणात काम करण्याची इच्छा
जागृती म्हणाली की, मला ग्रामीण विकास, बालशिक्षण आणि महिला हक्कांमध्ये काम करायचे आहे. ग्रामीण जीवन सुधारण्याबरोबरच मुलांच्या शिक्षणावर आणि महिलांच्या हक्कांवर अधिक भर द्यायचे आहे असे तीने सांगितले.
मोबाईलपासून दूर राहिले, घराच्या व्हरांड्यात फिरत असतानाही हातात पुस्तके असायचे
यूपीएससीवर लक्ष केंद्रित करणाऱ्या जागृतीने स्वतःला मोबाईलपासून दूर केले होते. टीव्ही सुद्धा पाहत नव्हती. विशेष म्हणजे ती जेव्हा घराच्या व्हरांड्यात फिरत असे, तेव्हाही तिच्या हातात फक्त एक पुस्तक असे. ती म्हणाली की, मी कधीही टॉपर होण्याचा विचार केला नव्हता. परंतु, कोणत्याही परिस्थितीत UPSC परीक्षा पास करावी लागली, जेणेकरून मी IAS म्हणून काम करू शकेन असे मनात धारले होते असे ती म्हणाली.
भावाने दिले प्रोत्साहन
प्राध्यापक डॉ. अवस्थी भोपाळच्या नंबर 5 मार्केट परिसरात पत्नी मधुलाता, मुलगी जागृती आणि मुलगा श्रेयस यांच्यासोबत राहतात. श्रेयस MBBS करत आहे. तिचा भाऊ श्रेयस याने तिला यूपीएससी परीक्षा देण्यासाठी प्रोत्साहित केले असे जागृतीने सांगितले.
टॉपर होण्यासाठी 5 टिप्स
1. ध्येयाची स्पष्टता - तुम्ही काय करत आहात? परीक्षेची मागणी काय आहे? अभ्यासक्रम काय असावा? ते तुम्हाला स्पष्ट असले पाहिजे.
2. सुसंगतता - दररोज वाचा. दिवसातून 16-16 तास अभ्यास करणे आवश्यक नाही. रोज वाचायला हवे. फक्त वाचत रहा. यामुळे परीक्षेत नक्कीच यश मिळेल.
3. सराव - खूप सराव करा. टेस्ट सीरीज लावा. अभ्यासक्रमानुसार वाचा.
4. कारवाई करा - कोणतीही कारवाई करण्यास कधीही संकोच करू नका. जर तुमच्याकडे निर्णय घेण्याची क्षमता असेल तर तुम्ही पुढे जाल. मी भेल मध्ये प्रथम श्रेणीची नोकरी सोडली आणि यूपीएससीची तयारी केली.
5. कधीही हार मानू नका - कधीही मागे हटू नका. जर तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर त्यामध्ये पूर्णपणे सहभागी व्हा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.