आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या 24 तासांत देशात 3,451 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत, तर 40 जणांचा मृत्यू झाला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या म्हणजेच उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 20,635 झाली आहे. कोरोनामुळे महामारीच्या सुरुवातीपासून देशात एकूण 5.24 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी 3350, गुरुवारी 3545 आणि बुधवारी 3,275 नवीन रुग्णांची नोंद झाली.
दिल्लीत 1407 नवीन रुग्ण नोंदवली गेली आहेत. जी शुक्रवारपेक्षा कमी आहेत. परंतु 2 लोकांचा मृत्यू झाला आहे. राजधानीत पॉझिटिव्ह रेट 4.72%आहे. एका दिवसापूर्वी, दिल्लीत 1656 नवीन रुग्म आढळून आली होती. तर एकाही मृत्यूची नोंद झाली नव्हती. तेसच तर पॉझिटिव्ह रेट 5.39% होता. शेवटच्या दिवशी देशात 3.60 लाख कोविड सॅम्पल टेस्ट करण्यात आल्या आहेत.
दिल्लीनंतर हरियाणामध्ये सर्वाधिक रुग्ण
दिल्लीनंतर हरियाणा आणि महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आहेत. हरियाणामध्ये 473, केरळमध्ये 381 आणि महाराष्ट्रात 253 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात एकाचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशमध्ये 264, मध्य प्रदेशात 27 आणि राजस्थानमध्ये 59 नवीन रुग्ण आढळले आहेत. उत्तर प्रदेशमध्ये कोरोनामुळे 1 मृत्यू झाला आहे, तर हरियाणा, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही.
कोरोनामुक्त रुग्णाचा दर 98.74%
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मते, देशातील एकूण संसर्गामध्ये सक्रिय रुग्ण 0.05% आहे. तर कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचा दर 98.74% आहे. त्याच वेळी, दैनिक पॉझिटिव्ह रेट 0.78% नोंदविला गेला आहे आणि साप्ताहिक पॉझिटिव्ह रेट 0.79% आहे.
लसीकरण मोहिमेअंतर्गत देशात 190.20 कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत. आतापर्यंत, केंद्राने राज्यांना 193.53 कोटी पेक्षा जास्त डोस दिले आहेत.
WHO च्या अहवालावर विश्वास ठेवू नका -
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया म्हणाले की, 3 दिवसीय आरोग्य शिबिरात आम्ही असा ठराव मंजूर केला की कोविडमुळे मृत्यूच्या संख्येच्या डब्ल्यूएचओच्या अंदाजावर आम्हाला विश्वास नाही. आम्ही 1969 पासून जन्म आणि मृत्यूची कायदेशीर नोंदणी करत आहोत.
गर्भवती महिला कोरोनाचे सॉफ्ट टार्गेट -
कोरोनाचे सॉफ्ट टार्गेट गर्भवती महिला आहेत. परंतु कोरोना बाधित महिलांच्या पोटी जन्मलेल्या मुलांना संसर्ग होणे असामान्य आहे. म्हणजेच त्या मुलालाही कोरोनाची लागण झाली असेल असे नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.