आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Manish Tiwari's Support For The Scheme; He Said That The Country Needs A Young Army, The Plan Is A Step In The Right Direction

'अग्निपथ' योजनेवरुन काँग्रेसमध्ये मतभेद:मनीष तिवारींचा योजनेला पाठिंबा; म्हणाले - योजना योग्य दिशेने टाकलेले पाऊल

नवी दिल्ली12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या अग्निपथ योजनेला देशभरातून विरोध होत आहे. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनीही या योजनेवरुन केंद्रावर टीकेची झोड उठवली आहे. पण, काँग्रेसच्याच मनीष तिवारी यांनी या योजनेला पाठिंबा दर्शवत ही योजना योग्य दिशेने टाकण्यात आलेले पाऊल असल्याचे म्हटले आहे.

एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना तिवारी म्हणाले -सद्यस्थितीत देशाला मोबाइल आर्मी, यंग आर्मीची गरज आहे. तुम्हाला ही योजना पसंत असो किंवा नसो माझा या योजनेला पाठिंबा आहे. माझ्या मते, वन रँक-वन पेंशन योजनेमुळे वाढत्या पेन्शनचा बोजा सरकारच्या मोजणीपलीकडे गेला असेल.

लष्करात सुधारणांची गरज -तिवारी तिवारींनी यापूर्वीही अनेकदा पक्षाविरोधात भूमिका घेतली आहे. ते म्हणाले -तंत्रज्ञान व शस्त्रास्त्रांसाठी मोठा खर्च करावा लागतो. सर्वाधिक खर्च यावरच होतो. गेल्या 10 वर्षांत युद्धाचे स्वरूप बदलले आहे. हे खूप महत्त्वाचे आहे. 30 वर्षांपूर्वीच्या तुलनेत सध्या आपले सशस्त्र दल अधिक सूसज्ज आहे. आज आपले सैन्य तंत्रज्ञान व आधुनिक शस्त्रांवर अवलंबून आहे. यातील बहुतांश जण तरुण आहेत. अशा परिस्थितीत लष्करात अशा सुधारणांची नितांत गरज आहे.

बिहारच्या जहानाबादमध्ये गुरुवारी विद्यार्थ्यांनी पाटणा-गया रेल्वे मार्गावर अग्निपथ योजनेविरोधात निदर्शने केली.

काँग्रेसचा अग्निपथ योजनेला विरोध केंद्र सरकारच्या या योजनेला काँग्रेसचा विरोध आहे. या योजनेच्या विरोधात अनेक राज्यांत उग्र निदर्शनेही सुरू आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही या प्रकरणी सरकारवर निशाणा साधला आहे. ते सोशल मीडियावर म्हणाले - नो रँक- नो पेन्शन, 2 वर्षांपासून थेट भरती नाही, 4 वर्षांनंतर स्थिर भविष्य नाही, सरकारला सैन्याबद्दल आदरही नाही. पंतप्रधानांनी देशातील बेरोजगार तरुणांनी आवाज ऐकावा, त्यांना 'अग्निपथा'वर चालवून त्यांच्या संयमाची अग्निपरीक्षा घेऊ नये.

बातम्या आणखी आहेत...