आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउत्तराखंडमध्ये २२ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या चारधाम यात्रेची जोरदार तयारी सुरू आहे. सुमारे ९०० किलोमीटर लांबीच्या चारधाम यात्रा मार्गावर देशातील पहिला विद्युत तीर्थक्षेत्र कॉरिडॉर बनवला जात आहे. खासगी इलेक्ट्रिक वाहनांसाठी (ईव्ही) दर ३० किलाेमीटरवर चार्जिंग पॉइंट बनवले जात आहेत. राज्यातील सर्व गेस्ट हाऊसमध्ये चार्जिंग पॉइंटची सुविधाही उपलब्ध असेल. इलेक्ट्रिक तीर्थक्षेत्र कॉरिडॉरचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.
ई-वाहन चार्जिंग स्टेशनसाठीही जागा निश्चित करण्यात आली आहे. या वर्षीही यात्रेकरूंना ऑनलाइन नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. गेल्या यात्रेत झालेल्या मृत्यूंच्या घटनांपासून बाेध घेत पदयात्रेच्या मार्गावर प्रत्येक किलोमीटरवर डॉक्टरांचे पथक ऑक्सिजनसह तैनात राहणार आहे.
केदारनाथमध्ये यावेळी विशेष व्यवस्था
गेल्या वर्षी चार धाम यात्रेदरम्यान केदारनाथमध्ये सर्वाधिक ४०० यात्रेकरूंचा मृत्यू झाला होता. या वेळी विशेष वैद्यकीय व्यवस्था करण्यात आली आहे.
{केदारनाथकडे पायी चालण्याच्या मार्गावर प्रत्येक किलाेमीटरवर एक वैद्यकीय पाेस्ट तयारी करण्यात आली आहे. प्रत्येक ठिकाणी एक डॉक्टर आणि कर्मचारी तैनात केले जातील.
{मेडिकल पोस्टमध्ये ऑक्सिजन आणि इतर वैद्यकीय सुविधा चोवीस तास उपलब्ध असतील. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाला केदारनाथ, बद्रीनाथ, यमुनोत्री आणि गंगोत्री येथून विमानाने नेले जाऊ शकते.
४ लाखांपेक्षा अधिक नोंदणी
यात्रेसाठी नोंदणी प्रक्रिया २१ फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. ९ मार्चपर्यंत चार लाखांहून अधिक भाविकांची नोंदणी झाली आहे. पूर्वनोंदणीशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. गेल्या वर्षी विक्रमी ५५ लाख भाविक चारधाममध्ये आले होते. या वेळी यात्रेत ८० लाखांहून अधिक भाविक सहभागी होण्याची शक्यता आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.