आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयपूरमध्ये युगुलाचा खुल्लम खुल्ला रोमान्स:एकमेकांना आलिंगन देत शहरातून पळवली दुचाकी; VIDEO व्हायरल, पोलिसांकडून शोध सुरू

11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिंक सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजस्थानच्या जयपूरमधील एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. यात एक तरुण-तरुणी दुचाकीवरून जाताना खुल्लम खुल्ला रोमान्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ धुलिवंदनाच्या दिवशीचा असल्याचे सांगितले जात आहे.

कारमधील व्यक्तीने व्हिडिओ शूट केला

या दुचाकीच्या मागून जाणाऱ्या कारमधील एका व्यक्तीने हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावरून व्हायरल होत आहे. जयपूर शहरातील मुख्य रस्त्यावरून दुचाकीवर बसलेले तरुण या व्हिडिओत दिसते.

तरुणीचे घट्ट आलिंगन

यात सदरील तरुणी दुचाकीवर तरुणाच्या पुढे मागे तोंड करून बसलेली दिसते. तरुणाला घट्ट आलिंगन देऊन ही तरुणी दुचाकीवर बसलेली यात दिसते. हे दोघेही धुलिवंदनाच्या रंगात न्हाऊन निघाल्याचेही यात दिसते. भर दिवसा अशा अवस्थेत शहराच्या मुख्य रस्त्यांवरून दुचाकीने फिरणाऱ्या या जोडप्याकडे रस्त्यावरून ये-जा करणारा प्रत्येक जण आश्चर्याने बघत होता. अनेकांनी आपल्या कॅमेऱ्यात याचे व्हिडिओ शूट केले.

व्हिडिओ व्हायरल

याचे व्हिडिओ आता सोशल मीडियावरून व्हायरल होत आहे. दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी जोडप्याचा शोध सुरू केला आहे. दुचाकीच्या क्रमांकावरून या तरुण जोडप्याला पोलिस शोधत आहेत. दरम्यान, यावर सोशल मीडियातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे.

ही बातमीही वाचा...

भरधाव बाइकवर जोडप्याचा रोमान्स VIDEO:उत्तर प्रदेशातील घटना सोशलवर व्हायरल, वाहन क्रमांकावरून पोलिसांचा शोध सुरू

बातम्या आणखी आहेत...