आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Courses Should Not Be Closed After Admission Till Completion Of Education: High Court Verdict

निवाडा:प्रवेशानंतर आता शिक्षण पूर्ण होईपर्यंत अभ्यासक्रमाचे वर्ग बंद करू नयेत : हायकोर्टाचा निकाल

कोलकाता17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता उच्च न्यायालयाने यूजीसीने मान्यता रद्द केलेल्या अभ्यासक्रमाचे वर्ग सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. लीगल स्टडीज विद्यापीठातील हे प्रकरण आहे. हे कोर्स २०१२ पासून सुरू होते. या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांनी आधीच प्रवेश घेतलेला आहे. याप्रकरणी न्यायमूर्ती शुभेंदू सामंता यांच्या अध्यक्षतेखालील पीठ म्हणाले, सध्याच्या स्थितीत मान्यता रद्द करणे आणि शुल्क परत करण्याचा आदेश देणे अन्यायकारक होईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमाच्या तयारीसाठी पैशांसोबतच कष्टही केले आहेत. त्यामुळेच आधी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू ठेवले पाहिजेत. हा खटला पश्चिम बंगाल नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ ज्युरिडिकल सायन्सेस (एनयूजेएस) संबंधित आहे. या विद्यापीठात २०१२ पासून विविध ऑनलाइन अभ्यासक्रम घेतले जात होते. परंतु २०१८ मध्ये यूजीसीने या अभ्यासक्रमाची मान्यता रद्द केली. त्यानंतर अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात सापडले. म्हणूनच काही विद्यार्थ्यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, एनयूजेएससारखे प्रतिष्ठित विद्यापीठ एखादा अभ्यासक्रम चालवते तेव्हा कोणताही विद्यार्थी मान्यतेची पडताळणी करत नाही. म्हणूनच २०१२ नंतर अभ्यासक्रम निवडलेल्यांना अभ्यास पूर्ण करू दिला जावा.

बातम्या आणखी आहेत...