आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिल्लीतील एका न्यायालयाने शुक्रवारी महाराष्ट्रातील लोहारा पूर्व कोळसा वाटप प्रकरणातील घोटाळ्यात माजी कोळसा सचिव एच.सी. गुप्ता व कोळसा मंत्रालयातील माजी संयुक्त सचिव के. एस. क्रोफा यांना दोषी ठरवले आहे. विशेष न्यायाधीश अरूण भारद्वारज यांनी ग्रेस इंडस्ट्रिज लिमिटेड (जीआयएल) व त्याचे संचालक मुकेश गुप्ता यांच्यावरही गुन्हेगारी कट रचणे, फसवणुकीत सामील असल्याबद्दल दोषी ठरवले आहे. पुढील सुनावणी ४ ऑगस्ट रोजी होणार आहे. चारही दोषींना किती कालावधीची शिक्षा व्हावी यावर पुढील सुनावणीत युक्तिवाद होईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.