आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Court Instructions \ Survey, Occasionally Break The Lock, Survey Of Complete Premises With Enlightenment Mosque Basement, Report By May 17

कोर्टाचे निर्देश:सर्व्हे करा, प्रसंगी कुलूप तोडा, ज्ञानवापी मशीद तळघरासह पूर्ण परिसराचा सर्व्हे, 17 मेपर्यंत अहवाल द्यावा लागणार

लखनऊ/वाराणसी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीबाबत कनिष्ठ न्यायालयाने गुरुवारी म्हटले की, मशीद परिसरात तळघरापासून प्रत्येक ठिकाणचा सर्व्हे आणि व्हिडिओग्राफी करा. १७ मेच्या आधी अहवाल द्या. सर्व्हेसाठी कुलूप तोडावे लागले तर तोडा. कोणी रोखले तर जिल्हा प्रशासनाने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा. या सर्व्हेसाठी आयुक्त बदलला जाणार नाही, उलट दोन सहायक आयुक्तही नियुक्त होतील. तिकडे, मशिदीचे व्यवस्थापन सांभाळणाऱ्या अंजुमन इंतजामिया कमिटीच्या सदस्यांनी म्हटले की, आम्ही या निर्णयाला हायकोर्टात आव्हान देऊ.

ताजमहाल : कोर्टाने याचिकाकर्त्याला फटकारले, म्हटले- जनहित याचिकेचा असा दुरुपयोग करू नका ताजमहालच्या बंद २२ खोल्यांचे दरवाजे उघडण्याच्या मागणीवर कोर्टाने याचिकाकर्त्याला फटकारले. न्यायमूर्ती डी. के. उपाध्याय म्हणाले की, याचिकाकर्त्याने जनहित याचिका व्यवस्थेचा दुरुपयोग करू नये. आधी विद्यापीठात जा, पीएच. डी. करा, नंतर आमच्याकडे या. उद्या तुम्ही याल आणि न्यायाधीशांच्या चेम्बरमध्ये जायचे आहे असे म्हणाल. मग आम्ही तुम्हाला आमचे चेम्बर दाखवायचे का? तुम्ही म्हणता तसा इतिहास शिकवला जाणार नाही.

मथुरेत श्रीकृष्ण जन्मभूमी : हायकोर्टाने म्हटले, चार महिन्यांच्या आतच सर्व याचिकांचा निपटारा करा अलाहाबाद हायकोर्टात कृष्ण जन्मभूमी-ईदगाह प्रकरणाची सुनावणी झाली. सर्व याचिकांचा ४ महिन्यांत निपटारा करा, असे निर्दश कोर्टाने कनिष्ठ न्यायालयाला दिले. याची रोज सुनावणी करावी, अशी मागणी हिंदू पक्षकाराने केली होती. लखनऊच्या रंजना अग्निहोत्री यांनी श्रीकृष्ण जन्मभूमीच्या १३.३७ एकर जमिनीच्या मालकीच्या मागणीसाठी याचिका दाखल केली होती. तीत श्रीकृष्ण जन्मभूमीतील शाही ईदगाह मशीद हटवण्याची मागणी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...