आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Court Orders To The Central Government, Stop The Supply Of Oxygen To Industries Immediately, The First Right Of The Patients On This

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिल्ली हायकोर्टाचे निर्देश:केंद्र सरकारने उद्योगांना जाणारा ऑक्सिजनचा पुरवठा तात्काळ थांबवावा, यावर रुग्णांचा पहिला हक्क

नवी दिल्ली25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • उद्योग ऑक्सिजनची वाट पाहू शकतात, रुग्ण नाही

दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला उद्योगांना जाणारा ऑक्सिजनचा पुरवठा तात्काळ थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. कोर्टाने मॅक्स हॉस्पीटलमधील कमी ऑक्सीजन संदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणीदरम्यान हे आदेश दिले. कोर्टाने म्हटले की, ऑक्सिजनवर पहिला अधिकार रुग्णांचा आहे.

न्यायालयाने नाराजी व्यक्त करत म्हटले की, सरकारला वास्तवाविषयी काहीच माहिती नाही ? आपण लोकांना मरण्यासाठी सोडू शकत नाही. काल आम्हाला सांगण्यात आले होते की, तुम्ही ऑक्सिजन विकत घेत आहात, त्याचे काय झाले ? सध्या आपत्कालीन परिस्थिती उद्भवली आहे, सरकारने सर्व माहिती सांगावी.

उद्योग ऑक्सिजनची वाट पाहू शकतात, रुग्ण नाही

या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान कोर्टाने म्हटले की, असे कानावर आले आहे की, गंगा राम हॉस्पीटलमध्ये डॉक्टरांना कोविड-19रुग्णांना कमी ऑक्सीजन देण्यास सांगितले जात आहे. कोर्टाने म्हटले की, असे कोणते उद्योग आहेत, जे ऑक्सिजनशिवाय चालू शकत नाहीत. जे ऑक्सिजन उद्योगांना जात आहे, ते सर्व रुग्णांन द्या. उद्योग वाट पाहू शकतात, रुग्ण नाही.

बातम्या आणखी आहेत...