आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Covaxin Approved Countries; COVID Vaccine | DGCI Vaccine Approval To Bharat Biotech Covid 19 Covaxin

लहान मुलांच्या कोरोना लसीसाठी करावी लागणार प्रतिक्षा:सकाळी लसीला DCGI च्या मंजूरीचे वृत्त आले, दुपारी मंत्री म्हणाले - अजून यावर निर्णय नाही

नवी दिल्ली14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • यूरोपमध्ये मॉर्डर्नाच्या लसीला बालकांसाठी मंजूरी देण्यापूर्वी 12 ते 17 वर्षांच्या 3,732 बालकांवर ट्रायल करण्यात आली होती.

लहान मुलांसाठीच्या लसीसाठी देशाला अजून वाट पाहावी लागणार आहे. सकाळी बातमी आली की, केंद्र सरकारने एजन्सी ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI)ने 2 ते 18 वर्षे वयाच्या मुलांच्या लसीकरणासाठी स्वदेशी कोव्हॅक्सीनला मंजूरी दिली आहे. मात्र, नंतर स्वत: आरोग्य राज्यमंत्र्यांनी याचा इन्कार केला.

लहान मुलांच्या कोरोना व्हॅक्सीनवर केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री भारती प्रवीण पवार म्हणाल्या की, अजून यावर काम सुरु आहे. मला वाटते की, काही तरी गोंधळ झाला आहे. अजून DCGI ची मंजूरी मिळालेली नाही. विशेषज्ञ निर्णय घेतली त्यानंतर लस येईल. प्रक्रिया सुरू आहे आणि आम्ही त्यामध्ये हस्तक्षेप करत नाही.

अंतिम मंजुरीवर शिक्कामोर्तब नाही
DCGI च्या विषय तज्ज्ञ समितीने तिसऱ्या लाटेच्या इशाऱ्यानंतर 12 मे रोजी मुलांवर कोव्हॅक्सिनच्या चाचणीची शिफारस केली होती. हे लक्षात घेऊन DCGI ने चाचणीला मंजुरी दिली होती. भारत बायोटेकने जूनमध्ये मुलांवर कोवाक्सिनच्या चाचण्या सुरू केल्या. मात्र, त्याची अंतिम मंजुरी अद्याप बाकी आहे. जगातील विविध देशांमध्ये अशाच चाचण्यांनंतर, ही लस लहान मुलांसाठी मंजूर करण्यात आली आहे.

  • यूरोपमध्ये मॉर्डर्नाच्या लसीला बालकांसाठी मंजूरी देण्यापूर्वी 12 ते 17 वर्षांच्या 3,732 बालकांवर ट्रायल करण्यात आली होती. ट्रायलचे परीणाम देखील समोर आले होते की, लसीने मुलांमध्ये देखील प्रौढांच्या बरोबरीने अँटीबॉडी प्रोड्यूस केली आहे. ट्रायलदरम्यान 2,163 मुलांना कोरोना व्हॅक्सीन दिली गेली होती आणि 1,073 जणांना प्लास्बो. ज्या 2,163 बालकांना लस देण्यात आली होती, त्यांच्यामधून कुणालाही कोरोना झाला नाही आणि कोणताही गंभीर दुष्परिणाम देखील झालेला नाही.
  • चीनी व्हॅक्सीन कोरोनावॅक देखील 3 ते 17 वर्षांपर्यंतच्या मुलांवर प्रभावी दिसली आहे. कंपनीने दोन फेजमध्ये 550 पेक्षा जास्त मुलांवर लसीची ट्रायल केली होती. कंपनीने सांगितले की, ट्रायलमध्ये समाविष्ट केवळ दोन मुलांनाच लसीनंतर तीव्र ताप आला होता. इतरांमध्ये कोणताही साइड इफेक्ट दिसला नाही. लसीकरणानंतर 98% बालकांमध्ये अँटीबॉडी प्रोड्यूस झाल्या.
  • फायझरने 12 ते 15 वर्षे वयोगटातील 2,260 मुलांवर चाचणी केली जेणेकरून मुलांवर त्याच्या लसीची परिणामकारकता जाणून घेता येईल. त्यापैकी 1,131 जणांना लस देण्यात आली आणि उर्वरित 1,129 ला प्लास्बो देण्यात आला. लस घेतलेल्या 1,131 मुलांपैकी कोणालाही गंभीर दुष्परिणाम दिसले नाही. चाचणीच्या निकालानंतर, फायझरने सांगितले की त्याची लस मुलांमध्ये 100% प्रभावी आहे.
बातम्या आणखी आहेत...