आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोव्हॅक्सीनचा बूस्टर डोस डेल्टा आणि ओमायक्रॉन दोन्हींना नष्ट करु शकतो. कोव्हॅक्सिन मॅन्यूफॅक्चर्स भारत बायोटेकने इमोरी यूनिव्हर्सिटीमध्ये झालेल्या एका अभ्यासाच्या आधारावर हा दावा केला आहे. भारत बायोटेकने म्हटले की, कोरोनाच्या लाइव्ह व्हायरसवर कोव्हॅक्सीन (BBV152) बूस्टर डोसचा प्रयोग केला गेला. ज्यामध्ये बूस्टर डोसने डेल्टा आणि ओमायक्रॉन व्हेरिएंटला नष्ट करणारी अँटीबॉडी डेव्हलप केली आहे.
कंपनीच्या म्हणण्यानुसार, सँपल्सच्या अभ्यासादरम्यान, हे उघड झाले की बूस्टर डोसने 100% सँपल्समध्ये डेल्टा काढून टाकला आणि ओमायक्रॉन व्हेरिएंटमध्ये हा आकडा 90% राहिला. हा डेटा सूचित करतो की सतत बदलणाऱ्या महामारीमध्ये कोव्हॅक्सिन हा एक प्रभावी पर्याय आहे. अभ्यासादरम्यान लोकांना कोरोनाचे दोन्ही डोस दिल्याच्या 6 महिन्यानंतर बूस्टर डोस देण्यात आला होता.
सुरुवातीच्या अभ्यासामध्ये कोव्हॅक्सीनचा बूस्टर डोस प्रभावी
इमोरी व्हॅक्सीन सेंटरमध्ये लॅब अॅनालिसिस करणाऱ्या असिस्टेंट प्रोफेसर मेहुल सुथार यांनी म्हटले की, ओमायक्रॉन संपूर्ण जगात डॉमिनेंट व्हेरिएंट म्हणून आरोग्यासाठी धोका बनला आहे. या सुरुवातीच्या अॅनालिसिस डेटा सांगतात की, ज्या लोकांना कोव्हॅक्सीनचा बूस्टर डोस देण्यात आला आहे, त्यांच्यात डेल्टा आणि ओमायक्रॉन दोन्हींच्या विरोधात प्रभावी इम्यून रिस्पॉन्स डेव्हलप झाली आहे. या तथ्याने सिद्ध होते की, बूस्टर डोस आजाराची भयावहता आणि हॉस्पिटलाइजेशनचा धोका कमी करते.
भारत बायोटेकने म्हटले - आमचे लक्ष्य पूर्ण झाले
भरात बायोटेकचे चेअहमन डॉ. कृष्णा एल्ला म्हणले की, कंपनी सलग कोव्हॅक्सिन डेव्हलपमेंटमध्ये लागली आहे आणि नवीन प्रयोग सलग केले जात आहेत. कोरोनाच्या विरोधात ग्लोबल व्हॅक्सीन डेव्हलप करण्याचे आमचे लक्ष्य पूर्ण झाले आहे. आता कोव्हॅक्सीन प्रौढांना आणि लहान मुले दोघांनाही दिली जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.