आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Covaxin COVID 19 Vaccine | Bharat Biotech Submits Covaxin Phase 3 Clinical Trial Data To DCGI

कोव्हॅक्सीनवर मोठी बातमी:भारत बायोटेकची स्वदेशी कोरोना व्हॅक्सीन 77.8% प्रभावी, फेज 3 च्या ट्रायलच्या डेटाला SEC ची मंजूरी

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • WHO ने EOI ला मान्यता दिली

हैदराबादची कंपनी भारत बायोटेकची कोरोना व्हॅक्सीन कोव्हॅक्सीन फेज-3 च्या क्लीनिकल ट्रायलरमध्ये 77.8% प्रभावी ठरली आहे. कंपनीने गेल्या आठवड्यातच ट्रायलचा डेटा ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ला सोपवला होता. ज्यावर मंगळवारी सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीची महत्त्वाची बैठक झाली. यामध्ये लसीच्या तिसऱ्या फेजच्या ट्रायलच्या डेटाला मंजूरी देण्यात आली.

25,800 लोकांवर फेज-3 ची ट्रायल करण्यात आली होती. यामध्ये दिसले की, कोरोनाविरोधात ही व्हॅक्सीन किती बचाव करते. SEC च्या मंजुरीनंतर या डेटाला आता वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइजेशन (WHO)मध्ये सब्मिट केले जाऊ शकेल. कोव्हॅक्सीनला भारत बायोटेकने इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR)सोबत मिळून डेव्हलप केले आहे.

मार्च मध्ये प्राथमिक निकाल जाहीर झाला
मार्चच्या सुरुवातीला भारत बायोटेकने फेज-3 चाचणीचा अंतरिम निकाल जाहीर केला होता. प्राथमिक आकडेवारीनुसार सांगण्यात आले होते की, कोव्हॅक्सीन कोरोना संक्रमणापासून संरक्षण करण्यासाठी 81% प्रभावी आहे. त्याच वेळी, ही लस गंभीर आजारापासून किंवा संसर्गानंतर रुग्णालयात दाखल होण्यापासून 100% संरक्षण प्रदान करते.

WHO ने EOI ला मान्यता दिली
यापूर्वी भारत बायोटेकचे एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट (EOI) ला WHO ने स्वीकारले होते. कोवॅक्सिनला मान्यता मिळावी म्हणून कंपनीने 19 एप्रिल रोजी EOI सादर केले होते. या संदर्भातील सबमिशनपूर्व बैठक आता 23 जून रोजी होणार आहे.

WHO च्या इमरजेंसी यूज अप्रुव्हलचे महत्त्व काय आहे?
डब्ल्यूएचओच्या इमर्जन्सी यूज लिस्टिंगमध्ये महामारी सारख्या पब्लिक हेल्थ इमरजेंसीमध्ये हेल्थ प्रोडक्टची सेफ्टी आणि इफेक्टिव्हनेस तपासला जातो. डब्ल्यूएचओने फायझरच्या व्हॅक्सीनला 31 डिसेंबरला, ऑक्सफर्ड-अ‍ॅस्ट्रॅजेनेकाच्या व्हॅक्सीनला 15 फेब्रुवारी 2021 ला आणि जॉनसन अँड जॉनसनच्या व्हॅक्सीनला 12 मार्चला आपत्कालीन वापरासाठी मंजूरी दिली होती.

डब्ल्यूएचओच्या मते, आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता शक्यत तितक्या लवकर औषधे, लस आणि डायग्नोस्टिक टूल्स विकसित करणे आणि त्यास मान्यता देणे आवश्यक आहे. तेही सुरक्षितता, कार्यक्षमता आणि गुणवत्तेची मानके पूर्ण करताना. हे मुल्यांकन महामारीदरम्यान व्यापक स्तरावर लोकांसाठी या प्रोडक्ट्सची उपयोगिता सुनिश्चित करते.

बातम्या आणखी आहेत...