आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • COVAXIN Covid Vaccine Side Effects | Things Everyone Needs To Know About Bharat Biotech COVAXIN Vaccine Fact Sheet

कोव्हॅक्सीन फॅक्टशीट:तुम्हाला ताप आहे, गंभीर अ‍ॅलर्जी आहे तर घेऊ नका भारत बायोटेकची कोव्हॅक्सीन

नवी दिल्ली6 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • एडवर्स रिअ‍ॅक्शनमुळे भारत बायोटेकने मंगळवारी फॅक्टशीट जारी केली

केंद्र सरकारने म्हटले होते की, कमकुवत इम्यूनिटी असणाऱ्या किंवा इम्यूनिटी वाढवण्याचे औषध घेत असलेले रुग्णही कोरोना व्हॅक्सीन घेऊ शकतात. मात्र सलग समोर येत असलेल्या एडवर्स रिअॅक्शनमुळे भारत बायोटेकने मंगळवारी फॅक्टशीट जारी केली आणि म्हटले की, कमकुवत इम्यूनिटी असणाऱ्या आणि इम्यूनिटीला वाढवणारे औषध घेत असलेल्या रुग्णांनी कोव्हॅक्सीन घेऊ नये. जर अशा लोकांनी कोव्हॅक्सीन घेतली तर त्यांना गंभीर अॅलर्जिक रिअॅक्शन होऊ शकते. या सोबतच ज्यांना ताप आहे त्यांनीही व्हॅक्सीन घेऊ नये. चला तर मग जाणून घेऊया कोव्हॅक्सीनची फॅक्टशीट काय म्हणते.

तुम्हाला व्हॅक्सीनेशन सेंटरवर कोव्हॅक्सीन घेण्यापूर्वी काय सांगायचे आहे?
कोणतीही व्हॅक्सीन घ्यायची असते तेव्हा व्हॅक्सीनेशन अधिकाऱ्याला काही गोष्टी सांगाव्या लागतात. तुम्ही एखाद्या आजारासाठी नियमित औषध घेत आहात का? जर होत तर किती काळापासून आणि कोणत्या आजारासाठी? जर तुम्हाला यापैकी काही असेल तर व्हॅक्सीन न घेणे चांगले.

एखादी अॅलर्जी आहे का

 • ताप आहे
 • रक्तासंबंधीत विकार किंवा रक्त पातळ करण्याचे औषध घेत आहात
 • तुम्हाला इम्यूनोकॉम्प्रमाइज्ड आहे किंवा इम्यून सिस्टमला प्रभावित करणारे औषध घेत आहात
 • तुम्ही गरोदर आहात
 • तुम्ही स्तनपान करतात
 • तुम्ही दुसरी एखादी व्हॅक्सीन घेतली आहे

भारत बायोटेकची कोव्हॅक्सीन कोणाला दिली जाऊ शकते
CDSCO ने कोव्हॅक्सीनला क्लीनिकल ट्रायल मोडमध्ये मर्यादित वापराला मंजूरी दिली आहे. भारत सरकारने ज्या लोकांना कोरोना व्हॅक्सीनेशनच्या प्रायोरिटी ग्रुप्समध्ये ठेवले आहे त्यांना व्हॅक्सीन दिली जात आहे. व्हॅक्सीनेशन सेंटरवर प्रोग्राम अधिकारी त्यांना व्हॅक्सीनविषयी माहिती देतील. यानंतरही जर एखाद्या व्यक्तीने कोव्हॅक्सीन घेण्यास नकार दिला तर त्याला ती दिली जाणार नाही.

यापूर्वी कोव्हॅक्सीनचा वापर झाला आहे?
सेंट्रल ड्रग लायसेंस अथॉरिटीने सतर्कता घेऊन कोव्हॅक्सीनला क्लीनिकल ट्रायल मोडमध्ये विकण्याची आणि देण्याची परवानगी दिली आहे. क्लीनिकल ट्रायल्सच्या फेज-1 मध्ये 300 लोकांना आणि फेज-2 मध्ये 380 वॉलंटियर्सला व्हॅक्सीन दिली होती. क्लीनिकल ट्रायल्सच्या फेज-3 मध्ये 25,800 वॉलंटियर्सला व्हॅक्सीन देण्यात आली आहे आणि 6 जानेवारी 2021 च्या स्थितीमध्ये सर्व वॉलंटियर्सला कमीत कमी एक डोज देण्यात आला आहे.

कोव्हॅक्सीन घेतल्याने काय फायदे आहेत?
आतापर्यंत क्लीनिकल ट्रायल्समध्ये कोव्हॅक्सिनने चार आठवड्यांच्या आत दोन डोज दिल्यावर वॉलंटियर्समध्ये इम्यूनिटी डेव्हलप केली आहे. तसे कोव्हॅक्सिनची क्लीनिकल एफिकेसी (इफेक्टिव्हनेस) अजुन समोर आलेला नाही. यामुळे व्हॅक्सीन घेतली म्हणजे कोरोनाविषयी काळजी घेण्याची गरज नाही असे होत नाही.

कोव्हॅक्सीनचे काय साइड इफेक्ट्स आहेत?

भारत बायोटेकनुसार कोव्हॅक्सीनचे साइड इफेक्ट्समध्ये याचा समावेश आहे -

 • इंजेक्शनच्या ठिकाणी वेदना, सूज, लाल होणे, खाज येणे
 • हात आखडून जाणे
 • ज्या हातावर इंजेक्शन दिले तिथे कमजोरी येणे
 • अंगदुखी
 • डोकेदुखी
 • ताप
 • कमजोरी
 • उल्टी-मळमळ

गंभीर साइड इफेक्ट होऊ शकतो का?
कोव्हॅक्सीनमुळे गंभीर अॅलर्जिक रिअॅक्शन होण्याची शक्यता आहे, मात्र खूप कमी. यामुळे व्हॅक्सीनेशन अधिकाऱ्याला तुम्हाला सेंटरवर 30 मिनिट थांबायला सांगतील. व्हॅक्सीन दिल्यानंतर तुमच्या निगरानीसाठी तुम्हाला थांबावे लागेल. गंभीर अॅलर्जिक रिअॅक्शनचे लक्षण अशा प्रकारे आहेत -

 • श्वास घेण्यास त्रास
 • चेहरा आणि गळ्यावर सूज
 • हृदयाचे ठोके वाढणे
 • संपूर्ण शरीरावर लाल डाग पडणे
 • बेशुद्ध होणे आणि कमजोरी
 • यासोबतच इतर गंभीर किंवा अप्रत्याशित साइड-इफेक्ट्स समोर येऊ शकतात कारण कोव्हॅक्सीनचा अभ्यास अजुन सुरू आहे

साइड इफेक्ट्स झाल्यावर काय करायला हवे?
जर तुम्हाला कोव्हॅक्सीन घेतल्यानंतर काही साइड इफेक्ट झाले तर तुम्हाला डॉक्टर किंवा व्हॅक्सीनेशन अधिकाऱ्याशी संपर्क करा किंवा तुम्हाला तत्काळ जवळच्या रुग्णालयात जावे लागेल.

कोव्हॅक्सीनमुळे कोरोना इंफेक्शन होऊ शकते का?
नाही. ही एक इनएक्टिव्हेटेड व्हॅक्सीन आहे आणि मेलेला व्हायरस तुमच्या शरीरात इंजेक्ट केला जातो. यामुळे या व्हॅक्सीनमुळे कोरोना इंफेक्शन होण्याचा धोका अजिबात नाही.

तुम्हाला व्हॅक्सीन दिल्यानंतर किती महिने या प्रोग्रामचा भाग बनावे लागेल ?
कोव्हॅक्सीन दिल्यानंतर सर्व लोकांना दुसरा डोज दिल्यानंतर तीन महिन्यापर्यंत निगरानी असेल. या दरम्यान जर काही गंभीर साइड इफेक्ट दिसले तर भारत बायोटेककडून त्यावर उपचार केले जातील. यासोबतच भरपाई दिली जाईल. भरपाईची रक्कम ICMR ची सेंट्रल एथिकल कमिटी ठरवेल.

बातम्या आणखी आहेत...