आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतात शनिवारपासून कोरोना लसीचा दुसरा डोस देण्यास सुरुवात होईल. 70 लाखांवर लोकांना लसीचा एक डोस दिलेला आहे. दुसरीकडे, लसीकरण सुरू झालेल्या 74 देशांत नव्या रुग्णांत घट होत आहे. 11 जानेवारीनंतर जगात रोज आढळणाऱ्या रुग्णांच्या संख्येत 50% घसरण झाली. इतकी तीव्र घसरण कोरोनाकाळात प्रथमच दिसली आहे. विशेष म्हणजे जगात प्रथमच सक्रिय रुग्णांची संख्याही घटली आहे. सध्या एकूण 2.54 कोटी सक्रिय रुग्ण आहेत. महिनाभरापूर्वी ते 2.69 कोटी होते.
दुसऱ्यो डोसवर काय म्हणते सरकारी गाइडलाइन ?
केंद्र सरकारने लसीकरण सुरू करण्यापूर्वी FAQs जारी केले होते. यात सांगण्यात आले होते की, दोन डोसमध्ये 28 दिवसांचे अंतर गरजेचे आहे. ज्या व्हॅक्सीनचा पहिला डोस दिला होता, त्याच व्हॅक्सीनचा दुसरा डोस दिला जाईल.
दुसऱ्या डोसच्या 14 दिवसानंतर परिमाम दिसेल
कोव्हॅक्सीन तयार करणाऱ्या भारत बायोटेक आणि कोव्हीशील्ड तयार करणाऱ्या सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाच्या फॅक्टशीट्स सांगतात की, दोन दोसमध्ये 28 दिवसांचे अंतर असावे. केंद्र सरकारने राज्य सरकारांना सांगितले आहे की, 25 फेब्रुवारीपूर्वी सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना कमीत-कमी एक डोस मिळायला हवा. अशाच प्रकारे सर्व फ्रंटलाइन वर्कर्सला 1 मार्चपूर्वी एक डोस देण्याचे टार्गेट आहे.
दुसरा डोस 28 दिवशी न दिल्यास काय होईल ?
मुंबईमधील जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या इंफेक्शियस डिजीज डिपार्टमेंटचे कंसल्टेंट डॉ. माला वी. कानेरिया यांचे म्हणणे आहे की, ज्या व्हॅक्सीनचे दोन डोस गरजेचे असतात, त्यात चार दिवसांचा ग्रेस पीरियड असतो. म्हणजेच, ठरलेल्या दिवसापासून चार दिवस उशीर झाला, तरी काही अडचण येणार नाही.
सरकारचे म्हणणे आहे की, 1 कोटी आरोग्य कर्मचारी आणि 2 कोटी फ्रंटलाइन वर्कर्सच्या लसीकरणानंतर 27 कोटी वृद्ध आणि हाय रिस्क झोनमधील इतर लोकांना व्हॅक्सीन दिली जाईल. आशा व्यक्त होत आहे की, मार्चमध्ये दुसरा आणि सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम सुरू होईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.