आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Covaxin Covishield Supply Latest Update; Narendra Modi Orders For 44 Crore More Vaccines

लसीकरणावर सरकार अ‍ॅक्शनमध्ये:राज्यांना मोफत लस देण्याच्या घोषणेच्या दुसऱ्या दिवशी केंद्राने 44 कोटी व्हॅक्सीनची दिली ऑर्डर, 30% रक्कमही जारी

नवी दिल्ली13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 21 जूनपासून सर्वांना मिळणार केंद्राची लस

राज्यांना मोफत लस देण्याच्या घोषणेच्या दुसऱ्या दिवशीच केंद्र सरकारने व्हॅक्सीनची एक मोठी ऑर्डर दिली आहे. आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी 44 कोटी लसींची ऑर्डर जारी केली आहे. यामध्ये 25 कोटी कोवीशील्ड आणि 19 कोटी कोव्हॅक्सीनचा समावेश आहे. सरकारने कंपन्यांना ऑर्डरची 30% रक्कमही अडवान्समध्ये जारी केली आहे.

21 जूनपासून सर्वांना मिळणार केंद्राची लस
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी घोषणा केली की, 21 जूनपासून 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्वांना मोफत लसीचा फायदा मिळेल. पंतप्रधानांच्या या घोषणेच्या एक दिवसानंतर म्हणजेच मंगळवारी आरोग्य मंत्रालयाने लसीकरण कार्यक्रमाची नवीन गाइडलाइन्स जारी केली आहे. ही 21 जूनपासून लागू होईल.

नवीन गाइडलाइंसनुसार केंद्र सरकार लसी निर्माता कंपन्यांकडून 75% व्हॅक्सीन खरेदी करुन राज्यांना मोफत देईल. मात्र राज्यांना वेस्टेजपासून बचाव करावा लागेल अन्यथा त्यांना मिळणाऱ्या पुरवठ्यावर परीणाम होईल. यासोबतच म्हटले आहे की, प्रायव्हेट रुग्णालयांसाठी लसींची किंमत मॅन्युफॅक्चरर कंपन्याच घोषित करतील.

राज्य ठरवणार व्हॅक्सीनेशनसाठी प्रायरिटी
केंद्र सरकारकडून राज्यांना व्हॅक्सीनचे जेवढे डोस मिळतील. त्यामध्ये राज्यांना प्राधान्यक्रम ठरवावा लागेल. या प्रायरिटीमध्ये हेल्थकेअर वर्कर्स सर्वात आघाडीवर राहतील. यानंतर 45 वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक आणि नंतर ज्या लोकांचा दुसरा डोस बाकी आहे त्यांना प्राधान्य दिले जाईल. यानंतर 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांचा नंबर येईल. यांच्या लसीकरणासाठी राज्य सरकार आपल्या हिशोबाने प्राधान्यक्रम ठरवू शकेल.

बातम्या आणखी आहेत...