आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Covaxin Effectively Neutralises Delta Variant Of Covid 19 Top US Health Institute

कोव्हॅक्सिन आहे दमदार:कोरोनाच्या डेल्टा व्हॅरियंटवरही प्रभावी आहे ही व्हॅक्सिन, अमेरिकेच्या टॉप हेल्थ रिसर्च इन्टिट्यूट स्टडीमध्ये खुलासा

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन कोरोनाव्हायरसच्या अल्फा (B.1.1.7) आणि डेल्टा (B.1.617)वर देखील प्रभावी आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च आरोग्य संशोधन संस्था नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ (NIH) च्या स्टडीमध्ये ही माहिती समोर आली आहे.

NIHने कोव्हॅक्सिन घेतलेल्या लोकांच्या रक्ताच्या सीरम विषयी दोन स्टडी केल्या होत्या. ज्यामध्ये हे आढळले की, ही लस अल्फा आणि डेल्टा व्हॅरियंटला नष्ट करणाऱ्या अँटीबॉडी तयार करण्यास सक्षम आहे. डेल्टा व्हॅरियंटमुळे भारतात दुसरी लाट अधिक धोकादायक झाली होती.

अमेरिकन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थनुसार, आमच्या अ‍ॅडजुवेंटमुळे कोव्हॅक्सिनला जास्त प्रभावी करण्यास मदत मिळाली आहे. अ‍ॅडजुवेंट हे एक रसायन आहे, जे रोगप्रतिकारकशक्तीचा प्रतिसाद वाढवते. याचा वापर सामान्यतः लसीचा प्रभाव वाढवण्यासाठी केला जातो. हे इम्यून सिस्टीमला अँटीबॉडी बनवण्यास मदत करते, जे अँटीजनविरुद्ध लढा देते. अमेरिका आणि युरोपमधून भारत हे आयात करते.

गंभीर संसर्ग रोखण्यासाठी कोव्हॅक्सिन 100% प्रभावी
NIH नुसार, कोव्हॅक्सिनच्या फेज-2 ट्रायलवरून हे सुरक्षित असल्याचे आढळून आले आहे. याच्या फेज-3 ट्रायलचा डेटाही यावर्षी उपलब्ध होईल. फेज-3च्या निकालांनी हे सिद्ध केले आहे की, ही लस कोरोनाच्या सिम्प्टोमॅटिक संसर्गाविरूद्ध 78%, गंभीर संसर्गाविरूद्ध 100% आणि असिम्प्टोमॅटिक संसर्गावर 70% प्रभावी आहे.

बातम्या आणखी आहेत...