आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Covaxin Likely To Be Approved For Children By September Says AIIMS Director Dr Randeep Guleria

लहानग्यांचे स्वदेशी लसीकरण:लहान मुलांसाठी कोव्हॅक्सीन लसीला सप्टेंबरपर्यंत मिळू शकते मंजुरी, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील निकालांची प्रतीक्षा

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना व्हायरसविरुद्ध लहानग्यांना सप्टेंबरमध्ये व्हॅक्सीन मिळण्याची शक्यता आहे. एका प्रसिद्ध इंग्रजी वेबसाइटच्या वृत्तानुसार, एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी ही शक्यता वर्तवली आहे. त्यांनी इंडिया टुडेला दिलेल्या माहितीप्रमाणे, लहान मुलांवर कोव्हॅक्सीनच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांची प्रतीक्षा केली जात आहे. त्यानंतर सप्टेंबरमध्ये हे व्हॅक्सीन लहानग्यांना देण्याची परवानगी मिळू शकते.

तिसऱ्या लाटेत लहानग्यांना धोका नाही, शाळा सुरू करण्यावर विचार करायला हवा

गुलेरिया यांनी सांगितले की फायजर आणि बायोएनटेक यांच्या एका व्हॅक्सीनला मंजुरी मिळाल्यानंतर कोव्हॅक्सीन लहानग्यांसाठी दुसरा पर्याय ठरू शकते. दरम्या, तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका असल्याची शक्यता गुलेरिया यांनी फेटाळून लावली. या तर्काला काहीच आधार नाही असे ते म्हणाले आहेत. गुलेरिया पुढे बोलताना म्हणाले, शाळा सुरू करण्यावर देखील आता विचार करायला हवा. पण, शाळा आणि शैक्षणिक संस्था सुपर स्प्रेडर ठरणार नाहीत याचीही काळजी घ्यायला हवी. यासाठी कंटेनमेंट झोनमधील शाळांनी एक दिवसाआड सुटीचे नियोजन करावे आणि नियमांचे काटेकोर पालन करायला हवे.

दिल्ली, पाटणा एम्समध्ये लहान मुलांवर चाचण्या
अनेक तज्ज्ञांनी दावा केला होता की कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका आहे. अशात लहान मुलांना सुरक्षित ठेवण्याची आणि त्यांच्यासाठी व्हॅक्सीन आणण्याची तयारी सुरू झाली. एम्सच्या दिल्ली आणि पाटण्यातील रुग्णालयांत 2 ते 17 वर्षांच्या मुलांवर भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सीनच्या चाचण्या सुरू आहेत. भारतीय औषध महानियंत्रक (DGCI) ने 12 मे रोजीच लहान मुलांवर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांना मंजुरी दिली होती.

कॅडिलाच्या झायकोव्ह डी व्हॅक्सीनच्या देखील चाचण्या
कॅडिला कंपनीकडून याच आठवड्यात कोरोना व्हॅक्सीनसाठी डीजीसीआयकडे आपातकालीन मंजुरीची विनंती केली जाऊ शकते. या व्हॅक्सीनच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचा डेटा जवळपास तयार असून त्याची माहिती कंपनीने सरकारला दिली आहे. मोठ्यांसाठी व्हॅक्सीनच्या व्यतिरिक्त कंपनीने 12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांवर चाचण्या सुरू केल्या आहेत. लवकरच ही कंपनी 5 ते 12 वर्षे वयोगटातील व्यक्तींवर चाचण्या सुरू करू शकते. परंतु, या सर्वच गोष्टी चाचण्यांच्या निकालांवर विसंबून आहेत.

बातम्या आणखी आहेत...