आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्वदेशी लस महागडी:कोव्हॅक्सिनचेही दर जाहीर, राज्यांना 600 अन् खासगी हॉस्पिटलसाठी प्रतिडोस 1200 रुपये

नवी दिल्ली22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोविशील्डपेक्षाही महाग कोव्हॅक्सिन, केंद्राला मात्र 150 रुपयांत मिळणार

सीरमच्या कोविशील्डचे दर जाहीर होताच ‌वादंग शमत नाहीत तोच महागड्या लसीची आता दुसरी लाट आली असून ती अधिक चकित करणारी आहे. आयसीएमआरसोबत संयुक्तपणे निर्मिती केलेल्या कोव्हॅक्सिन या लसीचे दर भारत बायोटेकने शनिवारी जाहीर केले. ही स्वदेशी लस राज्यांना प्रतिडोस ६०० रुपये, खासगी रुग्णालयांना १२०० रुपयांना मिळेल. कोव्हॅक्सिन, अॅस्ट्राझेनेकाच्या कोविशील्डच्या तुलनेत ही लस महागडी ठरणार आहे. तथापि, केंद्र सरकारला मात्र ही लस प्रतिडोस केवळ १५० रुपयांत देण्यात येणार आहे.

कोव्हॅक्सिनची खरेदी राज्यांना परवडणारी नाही. खासगी रुग्णालयांसाठी तर हे दर जवळपास दुप्पट आहेत. फायझरने अमेरिकेत लसीचा दर प्रति डोस १,४७० रुपये ठेवला आहे. तर नोवाव्हॅक्सचा दर १२०० असून जॉन्सन अँड जॉन्सनची लस अमेरिकेला ७५० रुपयांतच मिळते. मात्र त्याचा केवळ एकच डोस घ्यावा लागतो.

सीरमची लस जगाला स्वस्त दिली, देशात महाग का : काँग्रेस
माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले, सीरमची लस हे सरकार जगात सर्वाधिक दराने खरेदी करेल. ही लस देशात सर्वात महाग कशामुळे? याची किंमत पुन्हा निश्चित झाली पाहिजे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रमेश यांच्या ट्विटवर उत्तर देताना म्हटले आहे की, केंद्र सरकार दोन्ही स्वदेशी लसींचे ५० टक्के प्रतिडोस १५० रुपयांत घेईल आणि राज्यांना ती मोफत देईल.

आणखी एका लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीस मंजुरी
सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने भारतीय कंपनी बायोलॉजिकल-ईच्या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीस मंजुरी दिली आहे. आता देशात १५ केंद्रांवर १२६८ लोकांवर चाचणी होईल. परिणाम सकारात्मक दिसला तर सहा महिन्यांत ही लस उपलब्ध होईल. नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल म्हणाले, मासिक सात कोटी डोस निर्मितीची कंपनीची क्षमता आहे.

तेलंगणात लस मोफत, आंध्राने ८ कोटी डोसची ऑर्डर दिली
तेलंगणात सर्व लोकांना लस मोफत दिली जाईल. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी ही घोषणा केली. ते म्हणाले, यासाठी २५०० कोटी रुपये खर्च होतील. दरम्यान, आंध्र प्रदेश सरकार १८-४५ वयोगटातील २.०४ कोटी लोकांना डोस देईल. आंध्राने कोव्हॅक्सिन व कोविशील्डच्या प्रत्येकी ४.०८ कोटी डोसची ऑर्डर दिली आहे.

कोविड उपचारांवर होणाऱ्या इतर खर्चापेक्षा खूप कमी दर, आणखी गुंतवणुकीची गरज
सीरम इन्स्टिट्यूटने सांगितले की, कोविडच्या उपचारावेळी होणाऱ्या इतर खर्चाच्या तुलनेत हे दर खूपच कमी आहेत. जगाशी तुलना योग्य नाही. सुरुवातीची किंमत तेव्हा मिळालेल्या निधीनुसार होती. विषाणूत सातत्याने बदल होतोय. महामारीशी लढा देण्याच्या दृष्टीने क्षमता विकसित करण्यासाठी गुंतवणुकीची गरज आहे. कोविशील्ड आजही कोविड-१९ वरील सर्वाधिक स्वस्त लस आहे.

संशोधन, निर्मितीसाठी स्वत:चे स्रोत वापरले
भारत बायोटेक म्हणते, आमची लस 78% प्रभावी आहे. त्याला 0 पेक्षाही कमी तापमानात ठेवण्याची गरज नाही. एखादी कुपी उघडल्यानंतर २-८ डिग्री तापमानातही २८ दिवस चांगली राहते. या लसीचे संशोधन आणि उत्पादनासाठी भारत बायोटेकने आपल्या स्वत:चे स्रोत वापरले आहेत. हा खर्च भरून निघण्याची गरज आहे.

सीरमने भारतापेक्षा अमेरिका, ब्रिटनला स्वस्तात दिली लस
देश किंमत (रु.)
भारत 150-600
सौदी अरेबिया 393
द.आफ्रिका 393
अमेरिका 299
बांगलादेश 299
ब्राझील 236
ब्रिटन 224
युरोपियन युनियन 161-262

बातम्या आणखी आहेत...