आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Covaxin Trials In Children Between 2 And 18 Years To Begin In 10 12 Days, Says Niti Aayog Member Latest News And Updates; News And Live Updates

लहान मुलांना मिळणार कोरोनाची लस:कोव्हॅक्सिनची चाचणी दोन आठवड्यात होणार सुरू, 2 ते 18 वर्षांच्या 525 मुलांना दिली जाईल लस

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लहान मुलांवरील ही कोव्हॅक्सिनची चाचणी दिल्ली, पटना आणि नागपुर शहरात होईल.

देशात सध्या 18 + वयोगटातील लोकांचे लसीकरण सुरु आहे. कोरोना महामारीची तिसरी लाट लहान मुलांना धोकादायक असल्याची शक्यता तज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. अशातच देशातून एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. सरकारने लहान मुलांवरील कोव्हॅक्सिन लसीच्या चाचणीला मान्यता दिली आहे. नीति आयोगाचे सदस्य डॉ. व्हीके पॉल यांनी मंगळवारी सांगितले की, ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) 2 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांवर कोव्हॅक्सिनच्या क्लिनिकल चाचणीच्या दुसर्‍या आणि तिसर्‍या टप्प्याला मान्यता दिली आहे. यामध्ये 2 ते 18 वर्षांमधील 525 मुलांना लस दिली जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

डॉ. पॉल पुढे म्हणाले की, येत्या 10 ते 12 दिवसांत ही चाचणी सुरु होणार असल्याचे मला कळवण्यात आले आहे. याव्यतिरिक्त, डीआरडीओकडून विकसित करण्यात आलेली अँटि-कोविड औषध 2 डीजीला देखील आपत्कालीन वापरास मान्यता मिळाली असल्याचे ते म्हणाले. देशात सध्या 18 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील लोकांचे लसीकरण चालू असून तेथेच कोव्हॅक्सिन लसीचा वापर करण्यात येत आहे.

दिल्ली, पटना आणि नागपुरमध्ये होणार चाचणी
लहान मुलांवरील ही कोव्हॅक्सिनची चाचणी दिल्ली, पटना आणि नागपुर शहरात होईल. यामध्ये एम्स दिल्ली, एम्स पटना आणि मेडिट्रिना इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस नागपूर यांचा समावेश असणार आहे. दरम्यान, विषय तज्ञ समितीने कोव्हॅक्सिनच्या 525 मुलांच्या चाचणी घेण्यास सहमती दर्शविली आहे.

त्यामुळे या लसीच्या यशानंतर कॅनडा आणि अमेरिकेनंतर भारतातदेखील 2 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी स्वदेशी लस तयार होईल. कोव्हॅक्सिन ही लस भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) च्या सहकार्याने भारत बायोटेकने विकसित केले आहे.

बातम्या आणखी आहेत...