आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोव्हॅक्सीन आहे दमदार:कोरोनाच्या 617 व्हेरिएंट्सचा प्रभाव कमी करु शकते कोव्हॅक्सिन, अमेरिकेच्या सर्वात मोठ्या महामारी एक्सपर्टचा दावा

नवी दिल्ली10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ICMR नेही म्हटले- कोव्हॅक्सिन डबल म्यूटेंटविरोधातही प्रभावी

कोरोनाचा धोका वाढत असतानाच स्वदेशी कोव्हॅक्सिनविषयी एक दिलासादायक बातमी आली आहे. अमेरिकेचे चीफ मेडिकल एडवायजर आणि महामारीचे टॉप एक्सपर्ट डॉ. एंथनी फौसी यांच्यानुसार कोरोनाचे 617 व्हेरिएंट्सचा प्रभाव कमी करण्यात कोव्हॅक्सिन फायदेशीर आहे.

फौसी यांनी म्हटले की, भारतात कोव्हॅक्सिन घेणाऱ्या लोकांच्या डेटावरुन व्हॅक्सीनच्या प्रभावाविषयी माहिती मिळाली आहे. यामुळे भारतात गंभीर परिस्थिती असूनही लसीकरण खूप महत्त्वाचे ठरु शकते.

ICMR नेही म्हटले- कोव्हॅक्सिन डबल म्यूटेंटविरोधातही प्रभावी
इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने 20 एप्रिलला म्हटले होते की, कोव्हॅक्सिन डबल म्यूटेंट कोरोना व्हेरिएंट्सच्या विरोधातही प्रोटेक्शन देते. आपल्या अभ्यासाच्या आधारावर ICMR ने म्हटले की, ब्राझील व्हेरिएंट्सचा, UK व्हेरिएंट् आणि दक्षिण अफ्रीकी व्हेरिएंट्वरही ही व्हॅक्सीन प्रभावी आहे आणि त्यांच्याविरोधातही ही लस प्रोटेक्शन देते.

देशात सुरु असलेल्या दुसऱ्या लाटेसाठी या व्हेरिएंट्ला जबाबदार ठरवले जात आहे. खरेतर भारताच्या 10 राज्यांसमोर आलेल्या डबल म्यूटेंट कोरोना व्हेरिएंट् सर्वात घातक आहे. हे फक्त झपाट्याने ट्रांसमिट होत नाही तर खूप कमी काळात जास्त नुकसान पोहोचवते. तर UK, ब्राझील आणि दक्षिण अफ्रीकी व्हेरिएंट्ही भारतात वाढत आहेत. री-इन्फेक्शनचे प्रकरणेही समोर येत आहेत.

क्लिनिकल ट्रायलमध्ये कोव्हॅक्सिन 78% पर्यंत प्रभावी
कोरोना व्हॅक्सीन बनवणारी हैदराबादची कंपनी भारत बायोटेक आणि ICMR ने कोव्हॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्याच्या अंतिम क्लीनिकल ट्रायल रिपोर्टमध्ये म्हटले होते की, कोव्हॅक्सिन क्लिनिकल 78% आणि कोरोनाने गंभीरित्या प्रभावित झालेल्या रुग्णांवर 100% पर्यंत प्रभावी आहे. कंपनीने आपल्या एनालिसिसमध्ये कोरोनाचे 87 लक्षणांवर रिसर्च केला होता. व्हॅक्सीनविषयी अंतिम रिपोर्ट जूनमध्ये जारी करण्यात येईल.

बातम्या आणखी आहेत...