आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Covaxin Vaccine Is Also Effective Against The Virus Found In India And The United Kingdom

कोरोना स्ट्रेन:भारत, ब्रिटनमध्ये सापडलेल्या विषाणूच्या स्वरूपावरही कोव्हॅक्सिन लस गुणकारी

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारतात स्पुटनिकचा साठा दाखल

भारत तसेच ब्रिटनमध्ये सापडलेल्या कोरोना विषाणूच्या नव्या स्वरूपावरही (स्ट्रेन) भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस गुणकारी ठरत असल्याची माहिती कंपनीच्या वतीने रविवारी देण्यात आली.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयएमसीआर) हे संशोधन केले आहे. यानुसार, कोरोनाच्या बी-१.६१७ तसेच बी-१.१.७ या विषाणूंवर ही लस गुणकारी ठरली आहे. या लसीमुळे रुग्णांच्या शरीरात न्यूट्रलायझिंग टायट्रेस (विषाणूविरोधी प्रभाव) निर्माण झाल्याचे संशोधनात दिसून आले. डी-६१४ विषाणूच्या तुलनेत मात्र हा प्रभाव कमी दिसून आल्याचे संशोधनात नमूद आहे.

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये बी-१.६१७ या विषाणूचा भारतात शोध लागला, तर बी-१.१.७ ब्रिटनमध्ये आढळला. भारतात सध्या कोव्हॅक्सिनसह सीरमची कोविशील्ड आणि रशियाची स्पुटनिक-व्ही ही लस दिली जात आहे. देशात आतापर्यंत १८.२२ कोटी लोकांना या विविध लसींचे डोस देण्यात आले आहेत.

भारतात स्पुटनिकचा साठा
रशियाच्या स्पुटनिक-व्ही लसींचा दुसरा साठा भारतात दाखल झाला आहे. यात ६० हजार डोस आहेत. यापूर्वी १ मे रोजी दीड लाख डोस आले होते.

ब्रिटनचा उलटा दावा
ब्रिटनमधील ऑक्सफर्ड विद्यापीठातील प्रो. अँथनी हार्डेन यांच्यानुसार, कोरोनाच्या बी-१.६१७ विषाणूवर ही लस फार गुणकारी ठरू शकणार नाही.

बातम्या आणखी आहेत...