आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Covaxin WHO Approval Latest News; Bharat Biotech's Covaxin To Get Who Nod This Week

कोव्हॅक्सीनला मिळणार आंतरराष्ट्रीय दर्जा:भारतात बनलेल्या कोव्हॅक्सीनला लवकरच मिळणार WHO ची मंजुरी; जगभरात निर्यात करण्यासह सुटणार परदेश वारीचा तिढा!

8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक आरोग्य संघटना याच आठवड्यात स्वदेशी कोरोना व्हॅक्सीन कोव्हॅक्सीनला मंजुरी देणार आहे. या व्हॅक्सीनची निर्मिती हैदराबाद येथील कंपनी भारत बायोटेक करत आहे. WHO ने मंजुरी दिल्यास त्याचा फायदा केवळ भारतच नव्हे, तर जगभरात हे व्हॅक्सीन लावलेल्या आणि लावणाऱ्या अशा सर्वांना होणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून WHO ची मंजुरी अडकल्याने कोव्हॅक्सीन घेतलेल्यांना परदेश प्रवास करण्यास अडचणी येत आहेत. एकदा मंजुरी मिळाल्यास त्यांना पासपोर्टसाठी हे व्हॅक्सीन वापरता येईल. सोबतच, भारत बायोटेकला हे स्वदेशी व्हॅक्सीन जगभरात निर्यात करता येईल. भारत बायोटेकच्या या व्हॅक्सीनला 13 देशांनी आधीच मंजूर केले.

कोरोनावर 78% प्रभावी
कोव्हॅक्सीन हे भारत बायोटेक आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) यांनी मिळून तयार केले आहे. तिसऱ्या टप्प्यातील चाचणीनंतर कंपनीने हे कोव्हॅक्सीन 78% प्रभावी असल्याचा दावा केला आहे. अर्थातच कोरोनापासून हे व्हॅक्सीन 78% प्रभावी आहे. चाचण्यांमध्ये सहभागी झालेल्यांपैकी ज्यांना कोव्हॅक्सीन लावण्यात आले होते, त्यापैकी कोरोना झालेल्यांमध्ये कुणामध्येही गंभीर लक्षणे दिसून आलेली नाहीत. म्हणजे, गंभीर लक्षणांच्या विरोधात हे व्हॅक्सीन 100% प्रभावी आहे.

सर्वच व्हेरिएंटवर प्रभावी असल्याचा ICMR चा दावा
कोरोना व्हायरसनंतर काही म्यूटंट व्हायरसने प्रहार केला. त्या सर्व नवीन व्हायरसच्या विरोधात कोव्हॅक्सीन प्रभावी असल्याचा दावा ICMR ने केला आहे. केवळ ब्रिटन, ब्राझील आणि दक्षिण आफ्रीकाच नव्हे, तर भारतात सापडलेल्या डबल म्यूटंट व्हेरिएंटवर सुद्धा हे व्हॅक्सीन इफेक्टिव्ह आहे.

WHO च्या आपातकालीन वापराच्या मंजुरीला महत्व का?
जागतिक आरोग्य संघटनेच्या आपातकालीन वापरासंबंधित यादीमध्ये महामारी सारख्या सार्वजनिक आरोग्य आपत्काळात आरोग्याशी संबंधित प्रॉडक्ट किती सुरक्षित आहे याची तपासणी केली जाते. WHO ने फायझरला 31 डिसेंबर रोजी, ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेकाच्या व्हॅक्सीनला 15 फरवरी 2021 रोजी आणि जॉन्सन अँड जॉन्सनच्या लसीला 12 मार्च रोजी आपातकालीन मंजुरी दिली होती.

आपातकालीन परिस्थिती लक्षात घेता त्यासाठी आवश्यक असलेल्या औषधींना लवकर मंजुरी देणे हा यामागचा हेतू असतो. पण, त्यासाठी संबंधित औषध किंवा लस सुरक्षा आणि आरोग्याच्या सर्व मापदंडांवर योग्य ठरणे आवश्यक आहे. व्यापक प्रमाणात लोकांमध्ये त्यांचा वापर योग्य आहे किंवा नाही यासाठी हे सर्व काही केले जाते.

बातम्या आणखी आहेत...