आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतात कोराेना विषाणूचा परिणाम इतर देशांच्या तुलनेत भिन्न स्वरूपात दिसतोय. कारण विषाणूविरोधातील अँटिबॉडी भारतीयांनी दीर्घकाळ सुरक्षित ठेवण्यात असमर्थ ठरतेय. त्यामुळे लोक पुन्हा बाधित होत आहेत. आयसीएमआरनुसार देशात आतापर्यंत ४.५ टक्क्यांहून जास्त लोकांना एकापेक्षा जास्त वेळा बाधा झाली आहे. जगभरात पुन्हा संसर्ग होण्याचा दर सुमारे एक टक्का आहे. मात्र भारतात बाधित झाल्याच्या ६० दिवसांनंतर शरीरातील प्लाझ्मादेखील हळूहळू निष्क्रिय होत असल्याचे दिसते.
सीएसआयआरच्या संशोधकांनी राष्ट्रीय पातळीवर एक पाहणी केली आहे. त्यात देशातील अनेक भागांत विषाणूचा स्थानिक पातळीवर फैलाव झाल्याचा दावा करण्यात आला. नवी दिल्लीतील आयजीआयबीचे संचालक डॉ. अनुराग अग्रवाल म्हणाले, बाधितांमधील ३० टक्के लोकांमध्ये १५० ते १८० दिवसांपर्यंत अँटिबॉडी होत्या. काही बाबतीत तीन महिन्यांतच अँटिबॉडी संपल्याचे दिसून आले. विनालक्षण असलेल्या लोकांत अँटिबॉडीचा कमकुवत स्तरही पाहायला मिळाला. अँटिबॉडी कमी झाल्याने देशात पुन्हा संसर्ग वाढीचा वेग दिसून आला आहे.
नेदरलँड : डोस घेतलेल्या लोकांना भटकंती करता येणार
जगभरात कोरोना रुग्णांची संख्या १३.६ कोटींहून जास्त झालीये. २९.४ लाखांहून जास्त मृत्यू झाले. ३१,८६९,९९६ रुग्णसंख्या व ५७५,५९५ मृतांच्या आकड्यांसह अमेरिका सर्वाधिक बाधित देश आहे. ब्राझीलमध्ये १३,४४५, ००६ बाधित व ३५१,४६९ मृत्यू झाले. ब्राझील दुसऱ्या क्रमांकावर आहे.
जगभरात कोरोना रुग्ण १३.६ कोटींवर
फ्रान्सच्या आरोग्य मंत्रालयाने आपल्या देशात ५५ वर्षांहून कमी वयाच्या लोकांसाठी लसीचा मिक्स डोस देण्याचा सल्ला दिलाय. लसीचा दुसरा डोस बाकी असलेल्या वर्गासाठी हा सल्ला देण्यात आला. जर्मनीतही ६० हून कमी वयाच्या लोकांसाठी मिक्स डोस देण्याची तयारी केली जात आहे.
फान्स : ५५ हून कमी वयोगटास मिक्स डोस
चीनचे रोगनियंत्रण केंद्राचे संचालक गाआे फू यांनी देशाची कोरोना लस बचावाच्या पातळीवर जास्त प्रभावी नसल्याची कबुली दिली. गाआे म्हणाले, समस्येचे निवारण करण्यासाठी वेगवेगळ्या तंत्राच्या लसींचा वापर करणे असाही पर्याय होऊ शकतो. इतर देशांतील तज्ञही अशा पर्यायावर अभ्यास करू लागले.
आमची कोरोना लस कमी प्रभावी : चीन
पर्यटनस्थळांवरील बंदी उठवण्यासंबंधीचा प्रस्ताव नेदरलँड सरकारच्या विचाराधीन आहे. लोकांना पर्यटनास जाणे आवडेल का, याची पाहणी केली जात आहे. डच सरकारने शनिवारी उद्यानांसह अनेक पर्यटनस्थळे खुली केली. या भागात २ हजारांहून जास्त लोक आले . लस घेतलेल्यांनाच पर्यटनाची परवानगी दिली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.