आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
ब्रिटेनमध्ये एका आठवड्यामध्ये कोविड -19 चे दुसरे आणि नवीन व्हेरियंट मिळाले आहे. हेल्थ सेक्रेटरी मॅट हँन्कॉकने हे खूप चिंताजनक असल्याचे सांगितले आहे. हॅन्कॉकनुसार, नवीन व्हेरियंटचे दोन प्रकरणे समोर आले आहेत. दोन्हीही संक्रमित काही दिवसांपूर्वीच साउथ अफ्रिकेतून परतले होते. मॅट म्हणाले - आता नवीन गोष्टी समोर येत आहेत. जे लोक काही आठवड्यांमध्ये साउथ अफ्रिकेतून परतले आहेत. मी त्यांना आवाहन करतो की, त्यांनी क्वारंटाइन व्हावे आणि हेल्थ अॅडमिनिस्ट्रेशनशी संपर्क साधावा.
साउथ अफ्रिकेच्या हेल्थ डिपार्टमेंटनेही गेल्या आठवड्यात म्हटले होते की, कोरोनाचे नवीन जेनेटिक म्यूटेशन (साधारण भाषेत व्हायरसचे नवीन प्रकार) ची माहिती मिळाली आहे. यामुळे कोरोना संक्रमणाची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
साउथ अफ्रिकेशी लिंक का?
हे दोन गोष्टींनी समजता येऊ शकते. पहिली - साउथ अफ्रिकेच्या हेल्थ डिपार्टमेंटने जवळपास दोन आठवड्यांपूर्वीच सांगितले होते की, त्यांच्याकडे कोविड-19 चा नवा व्हेरियंट मिळाला आहे. दुसरी - ब्रिटनमध्ये नवीन व्हेरियंटचे दोन प्रकरणे समोर आली आहेत. हे दोन्हीही संक्रमित साउथ अफ्रिकेतून येथे पोहोचले. ब्रिटिश हेल्थ सेक्रेटरीही हेच म्हणत आहेत.
नवीन व्हेरियंट जास्त झपाट्याने परसरते
ब्रिटेनने सर्वात पहिले लसीकरणाला मंजूरी दिली होती. मात्र आता येथे झपाट्याने संक्रमण होत आहे. नवीन स्ट्रॅन 70% जास्त तेजीने पसरते. हँन्कॉकनेही म्हटले - कोविड-19 चे नवीन व्हेरियंट खूप चिंताजनक आहे. हे जास्त संक्रमक आहे, म्हणजेच जास्त तेजीने पसरते. यामुळे मी नुकतेच साउथ अफ्रिकेतून परतलेल्या लोकांना आवाहन करतो की, या लोकांनी क्वारंटाइन व्हावे. यांच्या संपर्कातील लोकांनीही क्वारंटाइन व्हायला हवे. त्यांनी हेल्थ डिपार्टमेंटशी संपर्क साधावा.
ब्रिटेनने साउथ अफ्रिकेतून येणाऱ्या फ्लाइट्सवर टेम्परेरी बॅन लावला आहे. जगातील जवळपास 40 देशांनी आणि साउथ अफ्रिकेतून येणाऱ्या फ्लाइट्सवर बंदी घातली आहे.
मात्र, एक्सपर्टचा सल्ला वेगळा आहे
एक गोष्टी स्पष्ट होऊ शकली नाही की, ब्रिटेन आणि साउथ अफ्रिकेत जो व्हेरियंट मिळाला आहे, तो एकसारखाच आहे की, दोघांमध्ये फरक आहे. याविषयी पब्लिक हेल्थ इंग्लँडच्या सुसान हॉपकिन्स यांनी म्हटले - जो नवीन व्हेरियंट आम्ही ब्रिटेनमध्ये पाहिला आहे आणि जो साउथ अफ्रिकेत सापडला आहे, तो खूप वेगळा आहे. यांचे म्यूटेशनही वेगळे आहे. एक गोष्ट समान आहे, दोन्हीही व्हेरियंट झपाट्याने पसरतात. आम्ही याविषयी अजून रिसर्च करत आहोत.
व्हॅक्सीन तर इफेक्टिव्ह राहणार
सुसान नवीन व्हेरियंट आणि वर्तमान परिस्थितीविषयी जास्त चिंतीत नाहीत. त्यांनी म्हटले - मला विश्वास आहे की, साउथ अफ्रिकेतून ज्या व्हेरियंटचे तार जुळत आहे, त्यावर लवकरच नियंत्रण मिळवता येईल. एवढेच नाही, आपल्याजवळ जी व्हॅक्सीन उपलब्ध आहे, ती देखील चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवू शकते. आमची व्हॅक्सीन नवीन व्हॅरिएंटवर प्रभाव करणार नाही. हे सिद्ध करणारा आमच्याकडे असा कोणताही पुरावा नाही.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.