आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Covid 19 India News And Updates| Corona Cases Cross 3 Crores In The Country, Last One Crore Cases Came In Just 50 Days

कोरोना महामारीचे दिड वर्ष:देशातील कोरोना रुग्णांनी ओलांडला 3 कोटींचा आकडा, फक्त 50 दिवसांत 1 कोटी रुग्ण वाढले

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सर्वाधिक प्रभावित झालेल्या 5 राज्यांपैकी 4 राज्ये दक्षिण भारतातील

मंगळवारी देशात कोरोना रुग्णांची संख्या 3 कोटींच्या पुढे गेली. 30 जानेवारी 2020 रोजी भारतात पहिला कोरोना रुग्ण आढळला होता. आता 17 महिन्यांनंतर एकूण रूग्णांची संख्या 3 कोटींवर पोहोचली आहे. मागील 1 कोटी रुग्णअवघ्या 50 दिवसांत सापडले आहेत. दुसऱ्या लाटेदरम्यान एका दिवसांत 4 लाखांहून अधिक संक्रमित व्यक्तींची नोंद झाली. ही संख्या संपूर्ण जगात सर्वाधिक होती.

आता दुसरी लाट कमकुवत झाल्यामुळे आणि लसीकरणाची व्याप्ती वाढल्यामुळे नवीन रुग्णांची संख्या पुन्हा 50 हजारांच्या खाली आली आहेत. देशात मंगळवारी 50 हजार 784 नवीन संक्रमितांची नोंद झाली आहे तर 68 हजार 529 रुग्णांनी कोरोनावर मात केली.

जगातील सर्वाधिक प्रभावित देश भारत
भारत जगात कोरोनामुळे दुसरा सर्वात प्रभावित देश आहे. अमेरिकेत सर्वाधिक 3.44 कोटी प्रकरणे समोर आली आहेत. मात्र आता या दोघांमध्ये केवळ 44 लाख रुग्णांचा फरक आहे. अमेरिकेने येथे वेगवान लसीकरण करून तिसर्‍या संभाव्य लाटेला थांबवले आहे. आता अमेरिकेत 10 हजारांहून कमी नवीन प्रकरणे आढळत आहेत. सध्याच्या वेगाने भारतात प्रकरणे आढळल्यास भारत अमेरिकेला मागे टाकू शकतो.

केवळ 17% लोकसंख्येला पहिला डोस मिळाला
लसीकरण ड्राइव्ह सुरू होऊन 5 महिने उलटले तरीही भारतात आतापर्यंत केवळ 17.8% लोकसंख्येला लसीचा पहिला डोस देण्याता आला आहे. 3.9% लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे.

सर्वाधिक प्रभावित झालेल्या 5 राज्यांपैकी 4 राज्ये दक्षिण भारतातील आहेत
देशात कोरोनाचे सर्वाधिक 59 लाख रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्यानंतर केरळ-कर्नाटकमध्ये 28-28 लाख, तामिळनाडूमध्ये 24 लाख आणि आंध्र प्रदेशात 18 लाख रुग्ण आढळले आहेत. सर्वाधिक लोकसंख्या असलेला उत्तर प्रदेश 17 लाखांसह सहाव्या क्रमांकावर आहे. देशाची राजधानी दिल्लीत 14 लाखाहून अधिक लोकांना संसर्ग झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...