आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • Covid 19 India News Update; 𝐈𝐂𝐌𝐑 𝐢𝐬𝐬𝐮𝐞𝐝 𝐀𝐝𝐯𝐢𝐬𝐨𝐫𝐲 𝐟𝐨𝐫 𝐂𝐎𝐕𝐈𝐃 𝟏𝟗 𝐇𝐨𝐦𝐞 𝐓𝐞𝐬𝐭𝐢𝐧𝐠 𝐮𝐬𝐢𝐧𝐠 𝐑𝐚𝐩𝐢𝐝 𝐀𝐧𝐭𝐢𝐠𝐞𝐧 𝐓𝐞𝐬𝐭𝐬 (𝐑𝐀𝐓𝐬)

पहिल्या होम टेस्टिंग किटला मंजूरी:पुण्याच्या कंपनीने बनवली घरीच कोविड टेस्ट करणारी देशातील पहिली किट, केवळ 2 मिनिटात अशी करता येईल चाचणी

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • पुण्यातील कंपनीच्या किटला अधिकृत परवानगी

कोरोना चाचणीबाबत इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने बुधवारी मोठा निर्णय घेतला. ICMR ने घरीच कोरोना चाचणी करण्यासाठी एका रॅपिड अँटीजन टेस्ट किटला मंजुरी दिली आहे. या किटद्वारे लोकांना नाकातून सँपल घेऊन चाचणी करता येईल. याच्या वापराबाबत नवीन अँडवायजरीदेखील जारी केली आहे.

ही टेस्टिंग किट पुण्याची 'मायलॅब डिस्कवरी सलूशन' नावाची कंपनी बनवत आहे. या किटच्या माध्यमातून लोक केवळ 2 मिनिटांमध्ये स्वतः टेस्टिंग करुन 15 मिनिटात रिजल्ट प्राप्त करु शकतात. या टेस्टिंग किटची किंमत केवळ 250 रुपये ठेवण्यात आली आहे.

मोबाइलमध्ये डाउनलोड करावे लागेल अॅप

ICMR कडून सांगितल्यानुसार, होम टेस्टिंग फक्त सिम्प्टोमॅटिक रुग्णांसाठी किंवा इतर कोरोना संक्रमित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींसाठी आहे. होम टेस्टिंग किट तयार करणाऱ्या कंपनीने सांगितले की, ही चाचणी मॅन्युअल पद्धतीने होईल. यासाठी गूगल प्ले स्टोअर आणि अॅपल स्टोअरवरुन अप डाउनलोड करावा लागेल. मोबाइल अॅपवरुन पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह रिपोर्ट मिळेल.

किटचे नाव कोवीसेल्फ
होम आयसोलेशन टेस्टिंग किटसाठी पुण्यातील कंपनी माय लॅब डिस्कवरी सॉल्यूशन लिमिटेडला अधिकृत केले आहे. तसेच, या टेस्टिंग किटचे नाव COVISELF (Pathocatch) आहे.

अशी करता येणार चाचणी

 • या किटमधून नाकाचे सँपल घ्यावे लागेल.
 • होम टेस्टिंग करणाऱ्याला टेस्ट स्ट्रिपचा फोटो घ्यावा लागेल.
 • हा फोटो ICMR च्या टेस्टिंग पोर्टलवर स्टोअर होईल.
 • यानंतर तो व्यक्ती पॉझिटिव्ह किंवा निगेटीव्ह असल्याची खात्री पटेल.
 • पॉझिटिव्ह आल्यानंतर होम आयसोलेशनसाठी ICMR आणि आरोग्य मंत्रालयाच्या नियमांचे पालन करावे लागेल.
 • लक्षण असलेल्या, पण या चाचणीत निगेटीव्ह आलेल्या लोकांना RT-PCR चाचणी करावी लागेल.
बातम्या आणखी आहेत...