आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Covid 19 India Update | Mumbai Delhi Coronavirus News | Coronavirus Outbreak India Cases LIVE Updates; Maharashtra Pune Madhya Pradesh Indore Rajasthan Uttar Pradesh Haryana Bihar Punjab Novel Corona (COVID 19) Death Toll India Today

कोरोना देशात:संक्रमितांचा आकडा 6.17 लाखांवर; देशात आतापर्यंत 90 लाख चाचण्या झाल्या, यातील 6% संक्रमित

कोरोना देशात LIVEएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात कोरोनामुळे आतापर्यंत 18 हजार 072 मृत्यू झाले, महाराष्ट्रात सर्वाधिक 8,053 मृत्यू

देशातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यातच आता सरकारने चाचण्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आता खासगी डॉक्टरांच्या सांगण्यावरुनही कोरोना चाचणी केली जाऊ शकते. आतापर्यंत फक्त सरकारी डॉक्टरांच्या सांगण्यावरुन कोरोना चाचणी केली जात होती. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले की, यामुळे जास्तीत जास्त कोरोना चाचण्या होऊ शकतील.

आयसीएमआरच्या रिपोर्टनुसार, देशभरात आतापर्यंत 90 लाख 56 हजार 173 लोकांच्या चाचण्या झाल्या आहेत. विशेष म्हणजे, यातील फक्त 6.70% टक्के संक्रमित आहेत. देशभरात आतापर्यंत 6 लाख 17 हजार 625 संक्रमित आहेत. covid19india.org नुसार, बुधवारी 19,428 रुग्ण समोर आले. तर,12,057 रुग्ण ठीक झाले.

कोरोना अपडेट्स 

- देशात कोरोनाच्या वाढत्या संसर्गात बुधवारपासून उत्तराखंडमध्ये चार धाम यात्रा सुरू झाली आहे. परंतू, फक्त राज्यातील नागरिकांसाठीच ही यात्रा असेल. पहिल्या दिवशी 422 भक्तांना ई-पास दिली जातील.

- केंद्रीय पर्यटन आणि संस्कृतीक मंत्री प्रहलाद पटेल यांनी सांगितले की, 6 जुलैपासून देशभरातील ऐतिहासिक ठिकाणे, म्यूजियम नागरिकांसाठी सुरू होणार आहेत. आर्किलॉजिकल सर्वे ऑफ इंडियासोबत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. यासाठी एक नवीन गाइडलाइनदेखील जारी केली जाईल.    - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी गुरुवारी देशातील पहिल्या प्लाज्मा बँकेची सुरुवात केली. यावेळी त्यांनी म्हटले की,, 'प्लाज्मा डोनेशनसाठी राज्य सरकारने काही नियम दिले आहेत. कोणताही कोरोनामुक्त झालेल्या व्यक्ती 14 दिवसानंतर प्लाज्मा दान करू शकतो. आशा आहे की, प्लाज्मा थेरेपीमुळे मृत्यूचे प्रमाण कमी होईल. प्लाज्मा बँक आजपासून सुरू होत आहे.' 

- केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी सकाळी आपले आकडे जारी केले. यानुसार, मागील 24 तासात 19 हजार 148 रुग्ण सापडले तर 434 रुग्णांचा मृत्यू झाला. तिकडे, देशात आतापर्यंत 6 लाख 4 हजार 641 संक्रमित झाले आहेत. यातील 2 लाख 26 हजार 947 अॅक्टिव केस आहेत. तर, 3 लाख 59 हजार 860 रुग्ण ठीक झाले आहेत. 

- इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) ने सांगितले की, बुधवारी देशात 2 लाख 29 हजार 588 सँपलच्या चाचण्या करण्यात आल्या. तर, आतापर्यंत देशभरात 90 लाख 56 हजार 173 टेस्ट झाल्या आहेत.

0