आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कोरोना व्हायरसवर हेल्थ मिनिस्ट्री:138 कोटी लोकसंख्या असलेल्या देशात लसीशिवाय हर्ड इम्यूनिटी विकसित करणे खूप धोकादायक

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 25,26 आणि 27 जुलैला पाच लाखांपेक्षा जास्त टेस्ट करण्यात आल्या, देशात 10 लाख लोकसंख्येमागे 324 टेस्ट
  • 21 राज्यांमध्ये 10 % पेक्षा कमी पॉझिटिव्ह रेट आहे, राजस्थान, पंजाब, मध्य प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये पॉझिटिव्हविटी रेट 5% पेक्षा कमी आहे

आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी गुरुवारी सांगितले की हर्ड प्रतिकारशक्ती हे अप्रत्यक्ष संरक्षण आहे. लसीकरणानंतर किंवा पूर्वीच्या आजाराने बरे झालेल्या रूग्णांमध्ये हर्ड रोग प्रतिकारशक्ती असते. भारताची लोकसंख्या 138 कोटी आहे. अशी लोकसंख्या असलेल्या देशात लसीशिवाय हर्ड इम्यूनिटी विकसित करणे योग्य नाही. हे अत्यंत धोकादायक आहे.

भारतामध्ये कोरोना व्हायरसमधून आतापर्यंत 10 लाखांपेक्षा जास्त रुग्ण बरे झाले आहेत. हे एक मोठे यश आहे. यावरुन दिसते की, आपले डॉक्टर, परिचारिका आणि हेल्थकेअर वर्कर्स खूप मेहतन आणि मनलावून काम केले आहे.

देशभरात 1400 लॅब्स बनवण्यात आल्या आहेत
राजेश भूषण यांनी सांगितले की, रिकव्हरी रेट वाढत आहे. एप्रिलमध्ये हा रेट 7.85% होता आणि आज हा रेट 64.4% टक्के आहे. आपण आपल्या टेस्टिंग इंफ्रास्ट्रक्चर वाढवला आहे. देशात एक कोटी 81 लाख 90 हजार टेस्ट करण्यात आलेल्या आहेत. आपण देशभरात 1400 लॅब्स बनवल्या आहेत. काल दिवसभरात चार लाख 46 हजार टेस्ट झाल्या आहेत.

21 राज्यांमध्ये 10% पेक्षा कमी पॉझिटिव्ह रेट
ते म्हणाले की - 25, 26 आणि 27 जुलैला आपण पाच लाखांपेक्षा जास्त टेस्ट केल्या. देशात 10 लाख लोकसंख्येमागे 324 टेस्ट होतात. तिकडे 21 राज्यांमध्ये 10% पेक्षा कमी पॉझिटिव्ह रेट आहे. राजस्थान, पंजाब, मध्य प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये पॉझिटिव्ह रेट 5% पेक्षा कमी आहे. आंध्र प्रदेश, पुदुच्चेरी, महाराष्ट्र सारख्या राज्यांमध्ये पॉझिटिव्हिटी रेट 10% पेक्षा जास्त आहे.

16 राज्यांमध्ये देशाच्या सरासरीपेक्षा जास्त रिकव्हरी रेट
राजेश यांनी सांगितले की, देशाच्या 16 राज्यांमध्ये देशाच्या सरासरीपेक्षा जास्त रिकव्हरी रेट आहे. यामध्ये दिल्लीमध्ये 88%, लडाखमध्ये 80%, हरियाणामध्ये 78%, आसाममध्ये 76%, तेलंगानामध्ये 74%, तामिळनाडूमध्ये 73%, राजस्थानमध्ये 70%, मध्य प्रदेशात 69%, गोव्यामध्ये 68 % आहे.

देशात मृत्यूदर जगातील सर्वात कमी
देशात मृत्यूदर 2.21% आहे. हे जगातील सर्वात कमी आहे. 24 राज्य असे आहे जिथे मृत्यू दर सरासरीपेक्षा कमी आहे.

भारतात दोन व्हॅक्सीनचे ट्रायल सुरू
जगात तीन व्हॅक्सीन फेज-3 क्लीनिकल ट्रायलवर आहे. यामध्ये अमेरिका, दूसरे ब्रिटन आणि तिसरे चीनमध्ये आहे. भारतात दोन व्हॅक्सीन आहेत. दोन्ही फेज-1 आणि फेज-2 ट्रायल सुरू झाले आहे. आठ हॉस्पिटलमध्ये ट्रायल सुरू आहे. व्हॅक्सीनचा फायदा दोन पद्धतींनी होऊ शकतो.