आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Covid 19 Second Wave News And Updates| Center Asks UP, Bihar To Prevent Dumping Of Dead Bodies In Ganga

नद्यांमध्ये मृतदेह सापडल्यानंतर कठोर भूमिका:केंद्राने यूपी आणि बिहारला म्हटले - गंगेत मृतदेह प्रवाहित करण्यावर बंदी घाला, सुरक्षितरित्या अंत्यसंस्कार करा

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनो व्हायरसच्या घटनांमध्ये वाढ झाल्यानंतर या नद्यांच्या काठावर अनेक मृतदेह दिसले.

उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये गंगेच्या किनाऱ्यावर शेकडो मृतदेह सापडल्यानंतर केंद्राने या प्रकरणात दखल दिली आहे. केंद्र सरकारने दोन्ही राज्यांना म्हटले की, गंगा आणि उपनद्यांमध्ये मृतदेह प्रवाहित करण्यावर बंदी घालावी. यासोबतच मृतदेहांवर सुरक्षित आणि सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यावर लक्ष द्यावे.

कोरोनो व्हायरसच्या घटनांमध्ये वाढ झाल्यानंतर या नद्यांच्या काठावर अनेक मृतदेह दिसले. 15 आणि 16 मे रोजी झालेल्या आढावा बैठकीत केंद्राने म्हटले आहे की गंगा व त्याच्या उपनद्यांमध्ये अर्धे जळलेले मृतदेह प्रवाहित केल्याची माहिती मिळाली आहे. हे अत्यंत चुकीचे आणि धोकादायक आहे.

CPCB ला मॉनिटरिंगची जबाबदारी
जल ऊर्जा मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, राज्यातील प्रदूषण नियंत्रण मंडळांना आरोग्य विभागांच्या मदतीने पाण्याच्या गुणवत्तेवर अनेक वेळा लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे (CPCB) संपूर्ण प्रकरणाचे परीक्षण-प्रगत विश्लेषण आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

मंत्रालयाच्या मते, अंत्यसंस्कार करण्यासाठी मदतीस प्राधान्य दिले पाहिजे. सरकारी आदेशांची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. या कामात वेळ वाया घालवू नये, असे मंत्रालयाने म्हटले आहे.

भास्करच्या बातमीनंतर यूपी सरकारने घातली होती बंदी
गंगा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात मृतदेह मिळाल्यानंतर आणि घाटाच्या किनाऱ्यावर मृतदेह दफन होत असल्याच्या 'दैनिक भास्कर'च्या वृत्तानंतर उत्तर प्रदेश सरकारने कारवाई केली होती. 'दैनिक भास्कर'ने UP मध्ये गंगा किनाऱ्याच्या 27 जिल्ह्यांतून ग्राउंड रिपोर्ट प्रकाशित केला होता. याच्या काही तासांमध्येच सरकारने सर्व जिल्ह्यांमध्ये नद्यांमध्ये मृतदेह प्रवाहित करण्यावर बंदी घातली होती.

काठावर गस्त वाढवण्याचा आदेश राज्य सरकारने जारी केला. गस्तीची जबाबदारी SDRF आणि PAC च्या वॉटर पोलिसांना देण्यात आली आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये या टीम 24 तास सलग मॉनिटरिंग करत आहेत. घाटांच्या किनाऱ्यावर आणि नद्यांमध्ये नावेच्या माध्यमातून गस्त घातली जात आहे.

अंत्यसंस्कारासाठी 5 हजार रुपये
यूपी सरकारने नगर पंचायत, नगरपालिका, महानगरपालिका आणि ग्रामपंचायत स्तरावर आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांच्या अंत्यसंस्कारासाठी प्रति व्यक्ती 5 हजार रुपये मंजूर केले आहेत. मृताच्या कुटूंबाकडून कोणतीही फी आकारली जाणार नाही.

बातम्या आणखी आहेत...