आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • COVID 19 Testing: Maharashtra Govt Slashes Charges For Coronavirus Tests By Private Labs

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना चाचणी:प्रायव्हेट लॅबमध्ये कोरोना टेस्टिंगसाठी द्यावे लागतील केवळ  980 रु., घरी बोलवून 1800 रु. मध्ये करुन घेऊ शकता टेस्ट

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • फीस कमी असल्याने सरकारी लॅबवर दबाव कमी होईल आणि जास्तीत जास्त लोक टेस्ट करु शकतील
  • कोविड सेंटर या हॉस्पिटल किंवा क्वारंटाइन सेंटरमध्ये तपासणी केल्यास तुम्हाला 1400 रु. द्यावे लागतील

राज्यात प्रायव्हेट लॅबमध्ये आता कोरोना टेस्ट करण्यासाठी 980 रु. द्यावे लागतील. प्रायव्हेट लॅबने आरटी-पीसीआर टेस्टची फीस 1200 रुपयांपेक्षा कमी करुन 980 रुपये करण्यात आली आहे. फीस कमी असल्याने सरकारी लॅबवर दबाव कमी असेल आणि जास्तीत जास्त लोक टेस्ट करु शकतील. यासोबतच महाराष्ट्र देशातील पहिले असे राज्य आहे जिथे कोरोना टेस्टिंगची फीस एवढी कमी आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 16 लाख 40 हजारपेक्षा जास्त लोक संक्रमित झाले आहेत.

कोरोना तपासणीला सरकारने तीन प्रकारात विभागले आहे. ज्याचे दर 980 रुपये, 1400 आणि 1800 रुपये आहेत. कोरोना तपासणीसाठी खासगी लॅबमध्ये जाणाऱ्या व्यक्तीला 980 रुपये द्यावे लागतील, तर कोविड सेंटर किंवा हॉस्पिटल किंवा क्वारंटाईन सेंटरमध्ये तपासणी करणाऱ्यांना 1400 रुपये द्यावे लागतील. दुसरीकडे, रुग्णाच्या घरी जाऊन कोरोना तपासणीसाठी नमुना घेतल्यास तुम्हाला 1800 रुपये द्यावे लागतील.

10 लाख लोकसंख्येवर 70 हजार चाचण्या घेण्यात येत आहेत
आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, राज्यात कोरोना नियंत्रित करण्यासाठी चाचण्यावर जोर देण्यात येत आहे. टोपे म्हणाले की, सामान्य लोकांना केंद्रस्थानी ठेवून राज्य सरकारने वारंवार कोरोना तपासणीचे प्रमाण कमी करून रुग्णांना दिलासा दिला आहे.
दर 10 लाख लोकसंख्येमध्ये 70 हजार चाचण्या केल्या जात आहेत. हे आणखी वाढवण्याचे प्रयत्न केले जात आहेत, जेणेकरुन कोरोना साथीवर अधिकतम नियंत्रण मिळू शकेल. टोपे म्हणाले की, राज्यात सुधारित दराप्रमाणे रुग्णांकडून पैसे घ्यावेत. यासाठी जिल्हादंडाधिकारी, पालिका आयुक्तांना इशारा देण्यात आला आहे.

गेल्याय 24 तासांत आढळले केवळ 3,645 रुग्ण
महाराष्ट्रात दिलासादायक बाब समोर आली आहे. गेल्या 24 तासांमध्ये येथे कोरोनाचे नवीन प्रकरणी खूप कमी नोंदवण्यात आली आहेत. सोमवारी राज्यात कोरोना संक्रमणाचे 3,645 नवीन प्रकरणं समोर आले यानंतर राज्यात एकूण संक्रमित रुग्णांचा आकडा वाढून 16,48,665 पर्यंत पोहोचला आहे. सोमवारी 84 संक्रमितांचा मृत्यू झाला. आरोग्य विभागानुसार राज्यात आतापर्यंत महामारीमुळे 43,3 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 1,34,137 रुग्ण सक्रिय आहेत. 14,70,660 रुग्ण बरे झाले आहेत.