आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • COVID 19 Treatment News Update | India Cipla Jubilant Gilead Sciences Deal Latest News Updates On Antiviral Drug Remdesivir

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनावर उपचार:दोन भारतीय कंपन्या कोरोना उपचारात फायदेशीर असलेली रेमडेसिविर औषध बनवणार, या औषधामुळे संक्रमितांवर 5 दिवसात परिणाम

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सिप्ला आणि जुबिलँट या रेमडेसिविरचे उत्पादन करू शकणार आणि भारतासर जगातील 127 देशांमध्ये विकू शकतील

लवकरच दोन भारतीय फार्मा कंपन्या कोरोनाच्या उपचारात फायदेशीर असलेली रेमडेसिविर औषध विकणार आहेत. सिप्ला आणि जुबिलँट लाइफ सायंसेजने रेमडेसिविर विकण्यासाठी अमेरिकी औषध कंपन्यांसोबत लायसेंसिंग एग्रीमेंट केले आहे. यानंतर दोन्ही कंपन्या भारतासह जगभरातील 127 देशांमध्ये हे औषध विकणार आहे. दोन्ही भारतीय कंपन्या उत्पादन करण्यासोबतच आपल्या ब्रँडचा वापर करू शकतील.

रेमडेसिविर औषधाने या महिन्यात क्लीनिकल ट्रायल पूर्ण केला आहे. यानंतर अमेरिकेतील फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन (एफडीए) ने याला कोरोना रुग्णांसाठी वापरण्यास मंजुरी दिली आहे. सिप्ला आणि जुबिलिएंट लाइफ सांयसेस दोन्ही कंपन्यांनी अमेरिकी कंपनीसोबत करार केल्याची पुष्टी केली आहे. रेमडेसिविर एक जेनेरिक औषध आहे, त्यामुळे याची किंमतही कमी असेल. 

रेमडेसिविरच्या वापराने साइट इफेक्ट नाही

रेमेडेसिविरच्या वापरावर कोरोना संक्रमितांमध्ये लवकरच सुधारणा दिसत आहे. इंडियन कांउसिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर)ने या औषधाला संक्रमितांवर उपयोगी म्हटले आहे. या औषधांच्या वापराने साइड इफेक्ट कमी होतात. सध्या भारतात रुग्णांवर हायड्रोक्सीक्लोरोक्वीनचा वापर होत आहे. या औषधाचे अनेक साइट इफेक्ट आहेत. डायबिटीज आणि ब्लड प्रेशरच्या रुग्णांवर या औषधामुळे इतर आजार होण्याची शक्यता आहे.

क्लीनिकल ट्रायलमध्ये 50 % रुग्णांना फायदा झाला

अमेरिकी औषध कंपनी गिलियड सायंसेसनुसार, साधारणतः कोरोना रुग्णांमध्ये 10 दिवसांच्या उपचारानंतर सुधारणा पाहायला मिळत आहे. परंतू, रेमडेसिविरच्या क्लीनिकल ट्रायलदरम्यान 5 दिवसातच रुग्णांमध्ये सुधारणा दिसत आहे.

बातम्या आणखी आहेत...