आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Covid 19, Unemployment Rate, Household Income, Centre For Monitoring Indian Economy, CMIE, Job Opportunities

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा परिणाम:1 कोटींपेक्षा जास्त लोकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड; चांगल्या नोकऱ्यांसाठी पाहावी लागणार अजून एका वर्षाची वाट

नवी दिल्ली19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लॉकडाऊन काळात 55% कुटुंबांची कमाई कमी झाली

कोरोना महामारीमुळे देशावर मोठा परिणाम झालेला पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेने देशाची परिस्थिती बिकट झाली, तर दुसऱ्या लाटेने एक कोटींपेक्षा जास्त लोकांना बेरोजगार केले. यात 97% पेक्षा जास्त कुटुंबांची कमाईदेखील कमी झाली.

प्रायवेट थिंक टँक सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकोनॉमी (CMIE) चे CEO महेश व्यास सांगतात की, मे महिन्याच्या अखेरपर्यंत देशातील बेरोजगारी दर 12% पर्यंत येऊ शकतो.

मागच्या वर्षी देशव्यापी लॉकडाउनमुळे मे महिन्यात बेरोजगारी दर 23.5% वर पोहचला होता. जानकार सांगत आहेत की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा पीक आता संपला आहे. आता राज्ये आर्थिक गोष्टींवर असलेली बंदी हटवतील आणि बेरोजगारी दर कमी होईल.

रोजगारावर कोरोनाचे साइड इफेक्ट्स

  • ज्यांची नोकरी गेली, त्यांना नवीन नोकरी शोधण्यात वेळ लागेल.
  • असंघटीत क्षेत्रांमध्ये नोकऱ्या लवकर मिळतील, पण क्वालिटी जॉब आणि संघटीत क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी तयार होण्यासाठी एक वर्ष लागेल.
  • अर्थव्यवस्था हळु-हळू रुळावर येत आहे. यामुळे परिस्थितीत सुधार होईल, पण पुर्ववतः होण्यासाठी वेळ द्यावा लागेल.
  • सध्या मार्केटमध्ये लेबर पार्टिसिपेशन रेट कमी होऊ 40% वर आला आहे. महामारीच्या आधी लेबर पार्टिसिपेशन रेट 42.5% होता.

भारतीय अर्थव्यवस्थेसाठी 3-4% बेरोजगारी दर सामान्य

अर्थव्यवस्थेचे जानकार व्यास सांगतात की, 3-4% बेरोजगारी दर आपल्या अर्थव्यवस्थेसाठी सामान्य आहे. येणाऱ्या काळात हा कमी होऊ शकतो. CMIE ने एप्रिलमद्ये 1.75 लाख कुटुंबांवर एक देशव्यापी सर्वे केला होता. या सर्वेंमध्ये मागच्या एका वर्षात केलेल्या कमाईचा त्रासदायक ट्रेंड समोरल आला होता. सर्वेमध्ये फक्त 3% कुटुंबांनी आपली कमाई वाढल्याचे सांगितले, तर 55% कुटुंबांनी कमाई कमी झाल्याचे म्हटले. उर्वरित 42% कुटुंबांच्या कमाईत कुठलाच बदल झाला नाही.

बातम्या आणखी आहेत...