आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डब्ल्यूएचओ:केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांची जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारताकडे अध्यक्षपद एका वर्षासाठी असेल

सध्या संपूर्ण जगात कोरोना महामारीन थैमान घातले आहे. अनेक देशात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. या विषाणूपुढे मोठ-मोठ्या देशांनी हात टेकवल्याचे दृष्य असताना भारताकडून दिल्या जाणाऱ्या लढ्याचे जागतिक स्तरावर कौतुक होत आहे. भारतानाने फक्त कोरोनाविरोधात योग्य उपाययोजना केल्या नाही, तर इतर देशांनाही मदत केली आहे. यातच आता केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन जागतिक आरोग्य संघटनेच्या 34 सदस्यीय कार्यकारी मंडळाचे पुढील अध्यक्ष होणार आहेत. यामुळे आता यापुढे भारताचे नाव अजून उंचावले जाईल.

194 देशांच्या जागतिक आरोग्य महासभेने मंगळवारी भारताला कार्यकारी मंडळावर नेमण्याच्या ठरावावर स्वाक्षऱ्या केल्याची माहिती आहे. सध्या जपानचे डॉ. हिरोकी नाकातानी हे जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यकारी मंडळाचे वर्तमान अध्यक्ष आहेत. डॉ. हर्षवर्धन हे डॉ. हिरोकी नाकातानी यांच्याकडून 22 मे रोजी पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे. 22 मे रोजी होणार्‍या जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत हर्षवर्धन यांची औपचारिक निवड केली जाईल. 

भारताकडे अध्यक्षपद एका वर्षासाठी असेल

अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, बोर्डाचे अध्यक्षपद अनेक देशातीव वेगवेगळ्या ग्रुपमध्ये एक-एक वर्षांसाठी दिले जाते. यावर्षी भारताकडे हे पद दिले जाण्याचे मागच्या वर्षीच ठरले होते. हर्षवर्धन कार्यकारी मंडळाचे अध्यक्षपद सांभाळतील, ही मीटिंग वर्षातून दोनवेळा होते. पहिली जानेवारी आणि दुसरी मे महिन्यात.

बातम्या आणखी आहेत...