आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • COVID 19 Update | Loss Of Taste Or Smell Includes In Coronavirus Symptoms Updates From Government

कोरोनावर सरकार:गंध क्षमता कमी होणे आणि चव न समजणे यांचा कोरोनाच्या लक्षणांमध्ये समावेश, आता 7 ऐवजी 9 लक्षणांच्या आधारे होणार चाचणी

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
हा फोटो रांचीच्या सदर हॉस्पिटलचा आहे. झारखंडमध्ये आतापर्यंत 1656 रुग्ण आढळले आहेत.
  • अमेरिकेने गेल्या महिन्यात या लक्षणांचा कोरोना लक्षणांच्या यादीमध्ये समावेश केला होता
Advertisement
Advertisement

कोरोनाच्या लक्षणांच्या यादीत आधी सात लक्षणांचा समावेश होता. पण आता ही संख्या 9 झाली आहे. गंध घेण्याची क्षमता कमी होणे आणि चव न समजणे या दोघांचा सरकारने कोरोनाची लक्षणांमध्ये समावेश केला आहे. याआधी ताप, कफ, थकान, श्वास घेण्यास अडचण, श्लेष्मा सह खोकला, मांस-पेशींमध्ये वेदना, नाकातून वाहते पाणी- गळा खराब होणे आणि जुलाब यांसारख्या लक्षणांचा समावेश होता. 

कोरोना पॉझिटिव्ह लोकांमध्ये ही लक्षणे आढळून आली : टास्क फोर्स 

गेल्या रविवारी झालेल्या कोरोनावरील टास्क फोर्सच्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली. टास्क फोर्सच्या काही सदस्यांनी सुचवले होते की कोरोना संसर्गाच्या चाचणीमध्ये गंध आणि चव न समजण्याची क्षमता कमी होण्याचा लक्षणांमध्ये समावेश समावेश करावा. कारण अनेक रुग्णांमध्ये ही लक्षणे आढळली होती. 

तज्ञ म्हणतात की गंध आणि चव न समजण्याची क्षमता ही कोरोनाची विशिष्ट लक्षणे नाहीत, परंतु सामान्य सर्दीमध्ये देखील होऊ शकतात. परंतु हे सिम्प्टोम कोरोना संसर्गाची चिन्हे असू शकतात. या आधारावर चाचणी केल्यास, रोगाचा लवकर शोध घेतल्यास उपचार सुरू करण्यास मदत मिळू शकते. यूएस नॅशनल पब्लिक हेल्थ इन्स्टिट्यूट सीडीसीने मेच्या सुरूवातीस कोरोना लक्षणांच्या यादीमध्ये त्यांचा समावेश केला होता. 

Advertisement
0