आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Covid 19 Using N 95 Masks With Valved Respirator? Beware Of Using N 95 Masks, Government Issued Advisory

N-95 मास्क बिनकामाचे:एन-95 मास्कवर लावलेले वॉल्व कोरोना व्हायरस रोखण्यात निरुपयोगी, केंद्राने राज्यांना पत्र लिहून दिले वापर थांबवण्याचे निर्देश

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मग कोणता मास्क वापरायचा? सरकारने दिला हा सल्ला

कोरोना व्हायरस रोखण्याच्या हेतूने आपण महागडे एन-95 मास्त लावून फिरत असाल तर वेळीच सावध व्हा. केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाचे महासंचालक डॉ. राजीव गर्ग यांनी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र पाठवून एन-95 मास्कचा वापर थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. हे मास्क कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यास अपयशी ठरत आहेत असेही त्यामध्ये सांगण्यात आले आहे.

मग काय वापरावे? सरकारने दिला हा सल्ला

सरकारने जारी केलेल्या निर्देशानुसार, तीन लेअर असलेले मास्क वापरणे उत्तम राहील. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) सुद्धा वॉल्व असलेले मास्क वापरण्यापेक्षा तीन लेअर असलेले मास्क वापरा असा सल्ला दिला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, जगभरातील डॉक्टर याच कारणामुळे एन-95 मास्क वापरण्यासोबत एक ट्रिपल लेअर मास्क सुद्धा एकत्रितपणे वापरत आहेत.

सरकारने एप्रिल महिन्यात घरात तयार केलेले मास्क वापरण्याचा सल्ला दिला होता. लोकांनी घराबाहेर पडण्यापूर्वी सर्वांना मास्क लावण्यास सांगण्यात येते. अशात लोक घरात तयार केलेले मास्क वापरू शकतात. निर्देशानुसार, हे मास्क रोज वापरल्यानंतर धुवून घेणे आवश्यक आहे. घरात मास्क तयार करण्यासाठी कुठल्याही कॉटनच्या कपड्याचा वापर केला जाऊ शकतो. होम मेड कपड्याच्या मास्कमध्ये कलर कोणता यातून काहीच फरक पडत नाही. परंतु, तो वापरण्यासाठी एकदा उकळत्या पाण्यात पाच मिनिटे ठेवणे आणि पूर्णपणे ड्राय करून घेणे आवश्यक आहे. मास्क उकळत्या पाण्यात धुताना त्यात मीठ टाकल्यास आणखी चांगले राहील. मास्कमध्ये तीन लेअर असावे. कुटुंबातील प्रत्येकाचा मास्क वेगळा असावा. कुणीही कुणाचे मास्क वापरू नये.