आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • COVID 19 Vaccination Of Children Update; Delhi Lucknow Chandigarh Ahmedabad | Children Vaccination Registration For 15 18 Year Olds Begins

15 ते 18 वर्ष वयोगटातील कोरोना व्हॅक्सीनेशन:आतापर्यंत 4.52 लाख मुलांना दिली लस, रजिस्ट्रेशन करणाऱ्यांची संख्या 12 लाखांच्या पार

एका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक

देशात 3 जानेवारी, म्हणजेच आजपासून 15 ते 18 वर्षाच्या मुलांना कोरोना लस दिली जात आहे. आतापर्यंत 4.52 लाख मुलांना व्हॅक्सीनचा पहिला डोस देण्यात आला आहे. यासोबतच लसीसाठी रजिस्ट्रेशन करणाऱ्यांची संख्या 12 लाखांच्या पार गेली आहे. लसीकरण आणि रजिस्ट्रेशनची संख्या झपाट्याने वाढत आहे.

फोटोंमध्ये पाहा मुलांचे कोविड व्हॅक्सीनेशन...

मुलांच्या लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन प्रोग्राम शनिवारीपासून झाला होता. सरकारकडून जारी निर्देशानुसार, कोविन अॅपवर पहिलेच बनलेल्या अकाउंट किंवा नवीन अकाउंट बनवून रजिस्ट्रेशन केले जाऊ शकत होते. या व्यतिरिक्त व्हॅक्सीनेशन सेंटरवर जाऊनही रजिस्ट्रेशन केले जाऊ शकत होते. रविवारी रात्रीपर्यंत 15 ते 18 वर्षांच्या 7.90 लाख मुलांनी लसीसाठी रजिस्ट्रेशन केले आहे.

पंतप्रधान मोदींनी 25 डिसेंबरला केली होती घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 25 डिसेंबरला राष्ट्राच्या नावाने दिलेल्या आपल्या संदेशात 15-18 वर्षांच्या वयाच्या मुलांना आणि किशोरवयातील मुलांना 3 जानेवारीपासून कोरोना लसीकरण सुरु करण्याची घोषणा केली होती. देशात सध्या 15-18 वयाच्या मुलांची संख्या जवळपास 10 कोटी आहे. जगातील 30 पेक्षा जास्त देशांमध्ये पहिल्यापासूनच लसीकरण सुरु आहे.

भारतात का आवश्यक आहेत मुलांचे लसीकरण?

 • अमेरिकेच्या सेंटर्स फॉर डिजीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशननुसार, कोरोना लसीने मुलांना कोविड-19 ने संक्रमित होण्यापासून रोखण्यास मदत मिळते.
 • कोरोना लसीने मुलांमध्ये गंभीर आजार, हॉस्पिटलाइजेशन, दिर्घकाळपर्यंत राहणाऱ्या आरोग्य समस्या आणि मृतांचा धोका कमी होतो.
 • आरोग्य तज्ज्ञांच्या मते, त्या मुलांसाठी लसीकरण खूप आवश्यक आहे. जे कोविड-19 च्या हाय रिस्क ग्रुपचा भाग आहेत. म्हणजेच लठ्ठपणा, मधुमेह किंवा दम्याने ग्रस्त मुले, ज्यांना कोविड-19 मुळे गंभीर आजारी पडण्याचा सर्वाधिक धोका असतो, त्यांच्यासाठीही आवश्यक आहे.
 • कोविड-19 पेक्षा जास्त संक्रमित परिसरात राहणाऱ्या मुलांसाठीही लसीकरण आवश्यक आहे.
 • दक्षिण आफ्रिकेत, ओमायक्रॉनमुळे 5 वर्षांखालील मुलांमध्ये रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा परिस्थितीत, भारतातील ओमायक्रॉनचा धोका पाहता मुलांचे लसीकरण सुरू करणे हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.
 • मुलांच्या लसीकरणाने त्यांचे शाळेत जाणे आणि खेळ आणि इतर गर्दीसंबंधीत कार्यक्रमांमध्ये सहभागी होणे हे सुरक्षित होईल.
 • मुलांमध्ये कोरोनाची कमी गंभीर लक्षणे दिसत असली तरी मुले या विषाणूचे वाहक बनतात. म्हणूनच मुलांचे लसीकरण महत्त्वाचे आहे.
 • आतापर्यंत, भारतातील प्रौढ लोकसंख्येपैकी केवळ 61 टक्के लोकांना कोरोना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. म्हणजेच, देशातील मोठ्या लोकसंख्येचे पूर्णपणे लसीकरण झालेले नाही, अशा लोकांच्या आजुबाजूला राहणाऱ्या मुलांना संसर्गाचा धोका जास्त असतो, त्यामुळे लसीकरण सुरू करणे आवश्यक आहे.
बातम्या आणखी आहेत...