आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशात गेल्या 24 तासांमध्ये साडे तीन लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण समोर आले आहेत. हे आकडे जवळपास 50 देशांमध्ये एका दिवसात आढळलेल्या रुग्णांपेक्षाही जास्त आहेत. दुसऱ्या लाटेमध्ये तेजीने परसत असलेल्या संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी कोविड टास्क फोर्सच्या मेंबर्सने कम्प्लीट लॉकडाऊनची मागणी केली आहे. या मेंबर्समध्ये एम्स आणि इंडियन काउंसल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR)चा समावेश आहे. यावर केंद्र सरकार सोमवारी निर्णय घेऊ शकते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन मेंबर्स हे एका आठवड्यापासून ही मागणी करत आहेत. ICMR चा तर्क आहे की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा पीक येणे अजून बाकी आहे. संस्थाननुसार या परिस्थितीत संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी दोन आठवड्यांचे पूर्ण लॉकडाऊन आवश्यक आहे.
केंद्र लावू शकते अंशतः लॉकडाऊन
केंद्राने ICMR आणि एम्सच्या सल्ल्यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही. सूत्रांनुसार 3 मेनंतर केंद्र यावर निर्णय घेऊ शकते. असे म्हटले जात आहे की, पूर्ण लॉकडाऊन नाही तर आंशिक लॉकडाऊनची घोषणा सरकारकडून केली जाऊ शकते.
एक्सपर्टने म्हटले - मेमध्ये संपू शकते कोरोनाची दुसरी लाट, पण नियम मानावे लागतील
अशोका यूनिव्हर्सिटीमध्ये त्रिवेदी स्कूल ऑफ बायोसायंसेजचे डायरेक्टर आणि वायरोलॉजिस्ट डॉ. शाहिद जमील यांनी दिव्यमराठीशी बोलताना म्हटले होते की, मेच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये कोरोना लाटेचा दुसरा पीक येऊ शकतो. किती प्रकरणे समोर येतील हे अद्याप सांगता येणार नाही. हा आकडा 5-6 लाख केस रोजचाही असू शकतो. खरेतर हा आकडा लोकांची कोरोनाविषयीची सावधगिरी आणि त्यांच्या व्यवहारावर अवलंबून असेल.
डॉ. जमील मानतात की, जर लोकांनी कोरोना दिशा-निर्देशांचे पालन केले तर मेच्या अखेरपर्यंत आपण दुसऱ्या लाटेपासून मुक्त होऊ शकतो. मात्र लोक अशा प्रकारे नियम मोडतच राहिले तर ही लाट अजूनही वाढू शकते.
राज्यांनी केला लॉकडाऊन लावण्याचा निर्णय
सध्या दिल्ली, राजस्थान, हरियाणा, ओडिशामध्ये पूर्णपणे लॉकडाऊन आहे. महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये मिनी लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. यूपीमध्ये वीकेंड लॉकडाऊन लावण्यात आले आहे. मध्य प्रदेशातही 7 मेपर्यंत जनता कर्फ्यू लावला गेला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.