आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Covid19 Drug Favilow Launched MSN Labs Launches Cheapest Covid 19 Drug Favipiravir At Rs 33

कोविड-19 ड्रग:भारतीय कंपनी MSN ग्रुपने कोरोनावरील सर्वात स्वस्त औषध 'फेविलो' केले लॉन्च, 200 एमजीच्या एका टॅबलेटची किंमत 33 रुपये

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • फेविलोमध्ये अँटी-व्हायरल ड्रग फेविपिराविरचा डोज आहे, हैदराबादची जेनरिक फार्मा कंपनी MSN ग्रुप लवकरच फेविपिराविरची 400 एमजीची टॅबलेट लॉन्च करणार

हैदराबादची जेनेरिक फार्मा कंपनी MSN ग्रुपने कोरोनाचे सर्वात स्वस्त औषध 'फेविलो' लॉन्च केले आहे. औषधामध्ये फेविपिराविर ड्रगचा डोज आहे. 200 एमजी फेविपिराविरची टॅबलेट 33 रुपयांमध्ये उपलब्ध होईल. कंपनीनुसार, लवकरच फेविपिराविरची 400 एमजीची टॅबलेटही बाजारत लॉन्च केली जाणार आहे.

आतापर्यंतचे सर्वात स्वस्त औषध

फार्मा कंपनीऔषधाचे नावकिंमत
MSN ग्रुपफेविलो₹ 33
जेनवर्क्ट फार्माफेविवेंट₹ 39
ग्लेनमार्क फार्माफेबिफ्लू₹ 75
सिप्लासिप्लेंजा₹ 68
हेट्रो लॅबफेविविर59₹ 59
ब्रिंटन फार्माफेविटन₹ 59

सर्वात जास्त परवडणारे औषध असल्याचा दावा

MSN ग्रुपचे सीएमडी डॉ. एमएसएन रेड्डींचा दावा आहे की, फेविलो कोविड-19 चे सर्वात प्रभावी आणि परवडणारे औषध आहे. ते म्हणाले की, आमची कंपनी औषधांची गुणवत्ता लक्षात ठेवण्यासोबतच लोकांना उपलब्ध करुन देण्यावर विश्वास ठेवते. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून फेविपिराविरला कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी मंजूरी मिळाली आहे. या औषधाने कोरोनाचे सौम्य आणि मध्यम लक्षण आढळणाऱ्या रुग्णांवर उपचार केले जातील.

बातम्या आणखी आहेत...