आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोरोनाची व्हॅक्सीन कोवीशील्डचे गंभीर साइड इफेक्ट झाल्याची बाब समोर आली आहे. चेन्नईमध्ये ट्रायलदरम्यान व्हॅक्सीन घेतलेल्या एका 40 वर्षीय वॉलेंटियरने न्यूरोलाजिकल समस्या (मेंदूशी संबंधित आजार) सुरू झाल्याचा आरोप लावला आहे. वॉलेंटियरने यासाठी सीरम इंस्टीट्यूटकडे 5 कोटी नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
वॉलेंटियरने सीरम इंस्टीट्यूटसोबतच इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) , ब्रिटेनच्या एस्ट्राजेनेका, ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI), ऑक्सफोर्ड व्हॅक्सीन ट्रायलचे चीफ इन्वेस्टीगेटर अँड्र पोलार्ड, यूनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफोर्डच्या द जेनर इंस्टीट्यूट ऑफ लेबोरेटरीज आणि रामचंद्र हायर एजुकेशन अँड रिसर्चच्या वाइस चांसलरला कायदेशीर नोटिस पाठवली आहे. वॉलेंटियरचे वकील एनजीआर प्रसाद यांनी सांगितले की, 21 नोव्हेंबरला पाठवलेल्या नोटीसचे अद्याप उत्तर मिळाले नाही.
90% पेक्षा जास्त परिणामकारक असल्याचा दावा
कोवीशील्डच्या अंतिम फेजचे ट्रायल्स दोन प्रकारात केले आहेत. पहिल्या ट्रायलमध्ये दावा केला आहे की, ही व्हॅक्सीन 62% परिणामकारक आढळली. तर, दुसऱ्या ट्रायलमध्ये 90% परिणामकारक असल्याचा दावा करण्यात आला. सरासरी इफेक्टिवनेस 70% च्या आसपास आहे. SII च्या एक्जीक्यूटिव डायरेक्टर सुरेश जाधव यांनी दावा केला होता की, व्हॅक्सीनचे प्रोडक्शन सुरू करण्यात आले आहे. जानेवारीपासून दर महिन्याला 5-6 कोटी व्हॅक्सीन तयार केल्या जातील. सरकारकडून परवानगी मिळाल्यानंतर डिस्ट्रिब्यूशन सुरू करण्यात येईल.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.