आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Covishield Covaxin COVID 19 Vaccine Survey Results; 69% Of People Are Still Afraid To Take The Dose

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लसीवर सर्व्हेक्षण:देशात पुढील आठवड्यापासून लसीकरण सुरू होण्याची अपेक्षा; मात्र लसीबाबत 69% लोकांच्या मनात अद्यापही संकोच

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • केवळ 26% पालक आपल्या पाल्यांना कोरोनाची लस देण्यास तयार आहेत

भारतात संक्रांतीच्या मुहूर्तावर 13-14 जानेवारीपासून कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात होऊ शकते. कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिनला मंजुरी देखील मिळाली आहे. यानंतरही, एका सर्वेक्षणात 69% लोकांनी लसी घेण्यास संकोच व्यक्त केला आहे.

जी टाळाटाळ नोव्हेंबरमध्ये होती, तीच जानेवारीतही कायम

हे सर्वेक्षण लोकल सर्किलने जानेवारीत केले होते. यामध्ये 8,723 लोकांनी सहभाग घेतला होता. गेल्यावर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये लसींबाबत जो संकोच लोकांमध्ये होता, तोच जानेवारीतही कायम आहे.

सर्वेक्षणात या गोष्टी समोर आल्या ...

  • लसीबाबत कोणत्याही प्रकारची घाई नसल्याचे 69% लोकांनी म्हटले आहे. याआधी डिसेंबरमध्येही 69% लोकांनी लसीबाबत असहमती दर्शवली होती. नोव्हेंबरमध्ये 59% आणि ऑक्टोबहरमध्ये 61% लोकांनी लस घेण्याबाबत घाई नसल्याचे म्हटले होते.
  • लस येताच ती शासकीय किंवा खासगी रुग्णालयातून घेणार असल्याचे 26% लोकांनी म्हटले आहे.
  • सर्वेक्षण केलेल्यापैकी 5% लोक सरकार-निर्मित अग्रक्रम गट (आरोग्य किंवा फ्रंटलाइन कामगार) मध्ये येतात. सरकारने ठरवलेल्या सर्व प्रक्रियेअंतर्गत लस घेणार असल्याचे यांनी म्हटले.

56% पालकांना तीन महिने प्रतीक्षा करायची आहे

  • भारत बायोटेकचा दावा आहे की त्यांची कोव्हॅक्सिन 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठीही सुरक्षित आहे. या आधारे, पालकांना विचारले गेले की ते शालेय मुलांना लस देणार का? यावर, फक्त 26% भारतीय पालकांनी म्हटले की जर एप्रिल 2021 पर्यंत किंवा शाळेच्या सत्रापूर्वी लस उपलब्ध झाली तर ते निश्चितपणे त्यांच्या मुलांना देतील.
  • 56% पालक म्हणाले की त्यांना आणखी तीन महिने थांबण्याची इच्छा आहे. तोपर्यंत अधिक डेटा प्राप्त होईल आणि त्याचे परिणाम समोर आलेले असतील. तेव्हा ते याबाबत निर्णय घेतील. 12% पालकांनी मुलांना लसीकरण करण्यास थेट नकार दिला आहे.

कोव्हिशील्ड आणि कोव्हॅक्सिनपासून लसीकरण सुरू होईल

ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI)ने रविवारी सीरम इंस्टिट्युट बनवत असलेली ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्रॅजेनेकाची कोव्हिशील्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन या दोन लसींना मंजुरी दिली होती. सध्या त्यांना आपत्कालीन वापरासाठी मान्यता मिळाली आहे. सध्या संपूर्ण देशात ड्राय रन होत आहे. जेणेकरून लसीकरणाच्या प्रक्रियेला अंतिम रूप देता येईल.

बातम्या आणखी आहेत...