आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Covishield Soon Approved; Central Government Should Decide How Many Dose Are Required: Ather Poonawala

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काेराेना लस:काेविशील्डला लवकरच मंजुरी; 5 काेटी डाेस तयार, किती डाेस हवे हे केंद्र सरकारने ठरवावे : अदर पूनावाला

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुढील काही दिवसांत काेराेना लसीला नियामकांकडून मंजुरी मिळण्याची अपेक्षा सीरम इन्स्टिट्यूटने व्यक्त केली आहे. कंपनीने काेविशील्ड लसीचे ४ ते ५ काेटी डाेस तयार ठेवले आहेत. आता ही लस किती प्रमाणात आणि किती लवकर हवी आहे हे केंद्र सरकारवर अवलंबून असेल, असे संस्थेेचे सीईआे अदर पूनावाला यांनी साेमवारी सांगितले. जगातील या सर्वात माेठ्या लस निर्माता संस्थेने सांगितले की, जुलै २०२१पर्यंत लसीचे ३० काेटी डाेस तयार करण्याचे उद्दिष्ट आहे. सीरम, अॅस्ट्राझेनेका आणि आॅक्सफर्ड विद्यापीठासाठी लसीचे उत्पादन करण्यात येत आहे. चाचणीत त्यांचाही समावेश आहे.

पहिल्या ६ महिन्यांत तुटवडा हाेऊ शकताे
अदर म्हणाले, भारत काेव्हॅक्स कार्यक्रमाचा एक भाग आहे. सीरमचे ५०% डाेस भारताला, ५०% काेव्हॅक्सला मिळतील. कंपनीने तयार केलेल्या ५ काेटी लसींपैकी बहुतांश देशातच उपयाेगात येतील. २०२१ च्या सुरुवातीच्या ६ महिन्यांत जागतिक पातळीवर लसीचा तुटवडा हाेऊ शकताे. त्यानंतर आॅगस्ट-सप्टेंबरमध्ये पुरवठा सुरळीत हाेऊ शकताे.’

बातम्या आणखी आहेत...