आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Covishield Vaccine Circulation; WHO News | World Health Organisation Alert On Fake Covishield Vaccines In India Uganda

लस घेण्यापूर्वी तपासून घ्या:भारत आणि युगांडामध्ये सापडली बनावट कोवीशील्ड, 2 आणि 5ml च्या कुपींनी देण्यात आले 10 डोस; सीरमने म्हटले - आम्ही एवढी लहान वायल बनवत नाही

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बॅच क्रमांक आणि एक्सपायरी डेटही बनावट

जागतिक आरोग्य संघटनेला (WHO) भारत आणि युगांडामध्ये बनावट कोरोना लस मिळाली आहे. अधिकृत लसीकरण केंद्रातून बाहेर नेऊन ही बनावट लस रुग्णांना देण्यात आली होती. बनावट कोवीशील्ड मिळाल्यानंतर WHO ने वैद्यकीय उत्पादनांबाबत इशारा जारी केली आहे. दुसरीकडे कोवीशील्ड बनवणारी कंपनी सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया (SII)ने म्हटले आहे की, ते 5 आणि 2 ml च्या कुपींमध्ये कोवीशील्ड पुरवत नाही.

डब्ल्यूएचओने म्हटले आहे, 'एसआयआयने लिस्टमध्ये दाखल व्हॅक्सीन बनावट असल्याची पुष्टी केली आहे. याविषयी WHO ला भारत आणि युगांडामध्ये रुग्णांच्या स्तरातून माहिती मिळाली होती. लसीवर लिहिलेली आवश्यक माहिती वारंवार गहाळ असल्यामुळे ती लस बनावट असल्याचे आढळून आले.'

बनावट लस लोकांसाठी एक मोठा धोका
डब्ल्यूएचओने म्हटले आहे की बनावट कोरोना लस त्वरित ओळखली पाहिजे आणि नष्ट केली पाहिजे. बनावट लस जगभरातील लोकांच्या आरोग्यासाठी एक मोठा धोका आहे. यामुळे रिस्क झोनमध्ये येणारे लोक आणि आरोग्य सुविधांवर अतिरिक्त ताण वाढेल.

बॅच क्रमांक आणि एक्सपायरी डेटही बनावट
WHO च्या ग्लोबल सर्व्हेलन्स अँड मॉनिटरिंग सिस्टीमने बनावट आणि निकृष्ट दर्जाच्या वैद्यकीय उत्पादनांबाबत कोवीशील्डच्या बनावट लस शोधल्या आहेत. युगांडामध्ये सापडलेली बनावट कोवीसील्डची कुपी 5 mlची होती, ज्यामध्ये 10 डोस लागू असल्याचे सांगितले होते. त्यावर बॅच क्रमांक 4121Z040 होता आणि बनावट एक्सपायरी डेट 10 ऑगस्ट लिहिली होती.

फायझरची बनावट लसही सापडली होती
बनावट कोरोना लस सापडण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी डब्ल्यूएचओने अमेरिकन देशांमध्ये फायजर-बायो एनटेकच्या बनावट कोरोना लसीबद्दल देखील सांगितले होते.

WHO ने अलर्ट जारी केला
दक्षिण आशिया आणि आफ्रिकेत बनावट औषधे आणि लस सापडल्यावर WHO ने मेडिकल प्रोडक्ट इशारा जारी केला आहे. डब्ल्यूएचओला यावर्षी जुलै-ऑगस्टमध्येच कोव्हशील्डच्या बनावट लसीबद्दल बातमी मिळाली होती. आता WHO ने वैद्यकीय उत्पादनांच्या पुरवठा साखळीवर नजर ठेवण्याचा सल्ला दिला आहे. आरोग्य संघटनेने म्हटले आहे की विशेषतः ज्या देशांमध्ये बनावट लस मिळण्याच्या घटना घडल्या आहेत तेथे त्याची गरज आहे.

बातम्या आणखी आहेत...