आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Covishield Vaccine Second Dose In 3 Months, Covishield Vaccine Dose Gap, Covaxin AstraZeneca Suport Ndia's Decision

कोविशील्ड डोसमधील गॅप:ॲस्ट्राझेनेकाने भारताच्या निर्णयाचे समर्थन केले, म्हणाले- व्हॅक्सिनच्या दुसरा डोस दुसऱ्या किंवा तिसऱ्या महिन्यात दिल्यास जास्त सुरक्षा देईल

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात कोरोना व्हॅक्सिन कोविशील्डच्या दोन डोसमधील गॅप वाढवण्याच्या सरकारच्या निर्णयाचे ब्रिटीश फार्मा कंपनी ॲस्ट्राझेनेका यांनीही समर्थन केले आहे. ॲस्ट्राझेनेका-ऑक्सफोर्डने या लसीचा फॉर्म्युला तयार केला आहे, तर सीरम इन्स्टिट्यूट हे कोविशील्ड या नावाने भारतात तयार करत आहे. ॲस्ट्राझेनेका क्लिनिकल ट्रायलचे मुख्य अन्वेषक प्रो. अ‍ॅन्ड्र्यू पोलार्ड यांनी शुक्रवारी सांगितले की, लस एका डोसनंतर दुसर्‍या आणि तिसर्‍या महिन्यांत अधिक संरक्षण प्रदान करते, म्हणजेच व्हॅक्सिनची संरक्षण पातळी आणखी वाढते. अशा परिस्थितीत, डोसमधील अंतर वाढवण्याच्या निर्णयामध्ये कोणतीही कमतरता दिसून येत नाही.

3 पॉईंटमध्ये समजून घ्या, भारताचा निर्णय बरोबर का आहे ?
1.
पोलार्ड शुक्रवारी एका मुलाखतीत ब्रिटनमधील ॲस्ट्राझेनेकाच्या दोन डोसमधील अंतर कमी करण्याचे आणि भारतात वाढवण्याविषयी बोलले. ते म्हणाले की, ब्रिटनने अशावेळी दोन डोसमधील अंतर कमी केले, जेव्हा त्यांच्या लोकसंख्येच्या एका मोठ्या भागाचे लसीकरण पूर्ण झाले होते.

2. अशा परिस्थितीत दोन्ही देशांच्या लसीकरण धोरणाची तुलना केली जाऊ नये, कारण दोन्ही देशांमध्ये वेगवेगळ्या परिस्थितीनुसार वेगवेगळे निर्णय घेण्यात आले होते.

3. भारतातील सद्य परिस्थिती पाहता हे स्पष्ट दिसून येत आहे की, लसीचा किमान एक डोस शक्य तितक्या लवकर लोकांना देण्याचा विचार करीत आहेत, हा योग्य निर्णय आहे.