आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Cow Urine And Corona: Cow Urine Heals And Kills Coronavirus, BJP MP Sadhvi Pragya Singh Thakur Claims

भाजप खासदाराचा दावा:रोज गोमूत्र घेत असल्याने आतापर्यंत कोरोना झाला नाही, यापुढे सुद्धा होणार नाही; खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांचा दावा

भोपाळ4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर पुन्हा चर्चेत आल्या आहेत. नुकतेच त्यांनी दावा केला की गोमूत्र घेतल्याने कोरोना होत नाही. साध्वींनी सांगितल्याप्रमाणे, त्या रोज गोमूत्रचा अर्क घेतात. त्यामुळेच त्यांना अजुनही कोरोना संक्रमण झालेले नाही. एवढेच नव्हे, तर गोमूत्राने यापुढे सुद्धा आपल्याला कोरोना होणार नाही. प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी भोपाळमध्ये रविवारी एका कार्यक्रमात हा दावा केला आहे.

खासदार म्हणाल्या, की गायीच्या मूत्राचा अर्क आपण दररोज घेतल्यास फुफुसांमध्ये संक्रमण राहत नाही. मी कठिण परिस्थितीतून जात आहे पण रोज गोमूत्र अर्क घेत असते. त्यामुळेच मला कोरोनासाठी कोणत्याही औषधी घेण्याची वेळ आलेली नाही. मी कोरोना ग्रस्त नाही आणि ईश्वर मला कोरोनाग्रस्त करणारही नाही. कारण मी त्या औषधीचा उपयोग करत आहे. होय, मी प्रार्थना करून गोमूत्र घेते. हे अमृततुल्य आहे. मी ते ग्रहण करत आहे. माझे आयुष्य राष्ट्रासाठी आहे. गोमूत्र जीवनदायी असते.

साध्वींनी सांगितली गोमूत्र घेण्याची पद्धत
साध्वी सांगतात, की केवळ देसी गायीचे मूत्र उपयोगी असते. यात त्यातही जंगलात चरणाऱ्या गायीचे मूत्र औषध स्वरुपी असते. मूत्राला स्वच्छ कपड्याने 16 वेळा स्वच्छ करावे. हे एका अॅसिडप्रमाणे काम करते. यामुळे पोट पूर्णपणे स्वच्छ होते. पोटात कुठलेही विकार होत नाहीत.

एक्सपर्ट काय म्हणतात?
भोपाळच्या गोवर्धन बोर्डाचे माजी अध्यक्ष आणि जिल्हा संवर्धन समितीचे उपाध्यक्ष प्रमोद नेमा यांनी सांगितल्याप्रमाणे, गोमूत्राचा वापर औषधी म्हणून केला जाऊ शकतो. हे अनेक आजारांमध्ये ठरू शकते. प्रामुख्याने पोटाच्या विकारांसाठी हे उपयुक्त आहे. पण, गोमूत्राचे सेवन केल्याने कोरोना थांबतो किंवा होत नाही असा दावा करता येणार नाही. कर्करोगावर सुद्धा केवळ प्राथमिक स्तरावर हे काही प्रमाणात उपयोगी ठरू शकते. गोमूत्र पिण्याचे फायदे असले तरीही ते थेट नव्हे, तर एका प्रक्रियेनंतर घेतले जावे.

बातम्या आणखी आहेत...